Top News

अखेर....! तीन दिवसानंतर बेपत्ता झालेला प्रज्वल मृतदेह आढळला #chandrapur#saoli

सावली:- सावली शहरातील प्रज्वल रोशन डोहणे हा आपल्या मेहुणा राहुल उंदिरवाडे याच्या सोबत मिळून दोघे शेतावरती खत टाकण्यासाठी गेले असता शेतालगत खताच्या बॅगा उतरवुन त्याला बोलले तु इथेच रहा मी खत टाकण्याकरीता केशरवाही येथुन खत टाकणाऱ्या मजूर यांना घेऊन येतो. मजूर मिळाल्यानंतर मजुरांना घेऊन परत शेताकडे आल्यानंतर राहुल हा खताजवळ येऊन पाहिले तो तिथे न दिसल्याने राहुलला वाटले प्रज्वल हा घरी गेलेला असावा म्हणून खत टाकून झाल्यानंतर राहुल प्रज्वलच्या घरी गेला. तर प्रज्वल घरी न आल्याची माहीती घरच्यानी दिली तर राहुलने आणी त्याचा घरच्याणी शोधाशोध केली घरचे लोक पोलीस प्रशासन, तालुका आपत्कालीन बचाव पथक तीन दिवस सतत गोसीखुर्दच्या नहरात शोधाशोध घेत होते. प्रज्वलचे हात खताच्या पिशवीने भरले असल्याने त्यामुळे तो नहराच्या पाण्यात हात धुवायला गेलेला असावा आणि कदाचित त्याचा पाय घसरून पडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता किंवा तालुक्यात बिबट आणि वाघाचा धुमाकुळ असल्याने नेले असावे असा अंदाजही शंका करण्यात आले होते.

सोमवार सायंकाळच्या सुमारास जवळपास पाच वाजताच्या सुमारास घोसीखुर्द नहरात मृतदेह आढळला. घरातील एकुलता एक मुलगा मृत्त पावल्याने घरात शोककळा व परिसरात हळहळ सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने