Top News

चिमुरात शिवाजी मोघे यांचे निषेधार्थ माना जमात बांधवांचा भव्य मोर्चा- हजारो आदिवासी बांधव मोर्च्यात सामील #chandrapur #chimur



चिमूर:- येथे दिनांक ०८/१०/२०२३ रोज माना जमातीचे वतीने माजी मंत्री शिवाजी मोघे यांनी केलेल्या असंविधानिक वक्तव्याच्या विरोधात माना जमातीच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.


सविस्तर वृत्त असे की माना जमात ही प्रामुख्याने विदर्भातील जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून माना ही स्वतंत्र आदिवासी जमात आहे. तिची स्वतंत्र धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा आहे. केंद्र शासनाच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये माना हि जमात क्रमांक १८ वर नमूद आहे. सन १९५५ मध्ये काका कालेलकर आयोगांनी " माना जमातीला अनुसूचित जमातीचे सर्व अधिकार व हक्क बहाल केलेले आहे. मंत्र नागपूर येथील आदिवासी क्षेत्रबंधन मुक्ती दिवस निमित्य जाहीर कार्यक्रमात माजी सामाजिक न्यायमंत्री श्री. शिवाजी मोघे यांनी आदिवासी माना जमाती बाबत असंविधानिक वक्तव्य करून मा. सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या दिनांक ०८/०३/२००६ च्या निर्णया विरुध्द असुन मा. सर्वोच्च न्यायालयाचे अपमान केलेले आहे. माना जमाती संबंधाने वारंवार असे वक्तव्य केल्या जात असते. त्यांचे हे विधान केवळ द्वेष भावना आणि आकसापोटी असून संपूर्ण माना जमातीचा अवमान केलेला आहे. त्यामुळे जमाती जमातीत निर्माण करून अशांतता व संभ्रम निर्माण होत आहे. यावर आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातून १० हजार आदिवासी माना जमातीच्या बांधवांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चिमूर येथे धडक मोर्चा नेऊन निषेध व्यक्त केला.

नागपूर येथील जाहीर कार्यक्रमात माना जमातीचे विरोधात शिवाजी मोघे यांनी चुकीचे वक्तव्य केले त्यावेळी विरोधी पक्षनेते तथा आमदार श्री. विजय वडेटीवार, माजी आमदार श्री. नामदेव उसेंडी सुद्धा उपस्थित होते या दोन्ही नेत्याचे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात माना जातीचे वास्तव्य असून त्यांनीही चुकीच्या वक्तव्याचा विरोध केला नाही. याबाबतही जाहीर नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यावेळी चिमूर तालुक्यातुन गावागावातील माना जमातीचे समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निवेदन देण्यापूर्वी उपस्थितांना आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र तालुका शाखा चिमूर माना आदिम जमात मंडळ मुंबई तालुका शाखा चिमूर, तसेच समन्वय समितीचे प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांची भाषणे झाली. त्यानंतर प्रतिनिधी शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शिवाजी मोघे माजी मंत्री यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी करण्यात केली. भविष्यात माना जमातीचे विरोधी असे व्यक्तव केलास लोकशाही मार्गाने तीव्र मला देण्यात येईल. यासाठी शासन प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने