आई-वडील रागावल्याने आठवीतील मुलीने उचललं टोकाचं पाऊल #chandrapur #gadchiroli #suicide


गडचिरोली:- कुटुंबियांनी रागावल्याने आठव्या वर्गातील विद्यार्थिनीने (Student Suicide) आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Gadchiroli Suicide) केली. ही घटना गडचिरोली शहरातील वनश्री कॉलनीत घडली. आर्या भास्कर बांबोळे (वय 15, वनश्री कॉलनी, गडचिरोली) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

आर्या ही नवेगाव येथील नवजीवन पब्लिक स्कूल येथे इयत्ता आठव्या वर्गात शिकत होती. शनिवारला आर्याच्या आईवडिलांनी तिला काही कारणासाठी रागावले होते. त्यामुळे आर्या प्रचंड नाराज झाली होती. या नाराज झालेल्या आर्याने सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, घटनेच्या वेळी आर्याचे वडिल नोकरीवर गेले होते. तर आई आर्याच्या लहान भावाला शिकवणीतून आणण्यासाठी गेली होती. पण जेव्हा ते सर्व घरी आले आणि पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत