घातपात कि अपघात? #Chandrapur #gadchiroli


बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा अचानक आढळला मृतदेह

गडचिरोली:- गडचिरोलीमधून (Gadchiroli News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 22 ऑक्टोबर पासून बेपत्ता असलेल्या एका 12 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमोल मधुकर सिडाम (12) रा. रामय्यापेठा ता. अहेरी, जिल्हा गडचिरोली असे मृत चिमुकल्याचा नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

अमोल मधुकर सिडाम हा 22 ऑक्टोबर रोजी जवळपास सकाळी 11 वाजेपासून घरातून बेपत्ता होता. आई वडील आणि गावकऱ्यांनी शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. काल रात्री तो सुद्धा घरी न आल्याने घरच्यांनी अहेरी पोलीस स्टेशन गाठून सदर माहिती पोलिसांना दिली. यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अमोलचा शोध घेण्यास सुरुवात केली. यानंतर गावाच्या परिसरात शोधमोहीम राबवत असताना गावातील तलावात अमोलचा मृतदेह आढळून आला.

यानंतर पोलिसांनी अमोलचा मृतदेह अहेरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. आपल्या तरुण मुलाचा मृतदेह पाहून अमोलच्या आई - वडिलांनी हंबरडा फोडला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. हा घातपात आहे कि अपघात याचा तपास पोलीस करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत