महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे:- अल्काताई आत्राम #chandrapur #Korpana


नारंडा येथे महिला आरोग्य मेळावा, बचत गट मार्गदर्शन, अंगणवाडी बालकांना टिफीन वाटप संपन्न
कोरपना:- कोरपना तालुक्यातील नारंडा येथे भारतीय जनता महिला मोर्चा, ग्रामपंचायत नारंडा यांच्या तर्फे सेवा सप्ताह निमित्त महिलांकरिता आरोग्य तपासणी शिबिर बचत गटातील महिलांना मार्गदर्शन व अंगणवाडीतील बालकांना मोफत टिफिन वाटप कार्यक्रम घेण्यात आला.

महिलांनी समाजात सक्षमपणे नेतृत्व करणे गरजेचे असून आज समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहे तसेच देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी महिलांचा सुद्धा मोठा वाटा असणे गरजेचे आहे, तसेच महिलांना दैनंदिन जीवनाच्या कामकाजातून आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही त्यामुळे अनेक महिलांची प्रकृती ठीक राहत नाही त्याकरिता महिलांनी वेळोवेळी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे तसेच महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात भारतीय जनता महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री व चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अल्काताई आत्राम यांनी केले.

या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री विजयाताई डोहे, नारंडा ग्रामपंचायतच्या सरपंच अनुताई ताजने,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर प्रांजली कोल्हे, डॉक्टर हेमा सोनकुसरे, दालमिया फाउंडेशनचे स्नेहा उपगल्लावार, ग्रामपंचायत सदस्य अनिल शेंडे यांची प्रमुख उपस्थित होती.

सदर कार्यक्रमात अंगणवाडी येथील बालकांना मोफत टिफिन वाटप करण्यात आले तसेच महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरात गावातील शेकडो महिलांनी आपली आरोग्य तपासणी केली तसेच बचत गटातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कोण कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकतो यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले, तसेच आयुष्यमान योजनेचे "आभा" कार्ड काढण्यासंदर्भात आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी गावातील अंगणवाडी शिक्षिका,आशा वर्कर आरोग्य विभागाचे कर्मचारी, तसेच गावातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या
या कार्यक्रमाचे संचालन माधुरी गोहणे तसेच आभार प्रदर्शन अनिता निवलकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत