वर्धा:- वर्धातून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय तरुणीची तिच्याच घरासमोर हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपुर्ण वर्धा जिल्हा हादरला आहे.
🌄
या घटनेमुळे दहेगाव गोसावी येथे तणावाचे वातावरण झाले आहे. वर्ध्यातील सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी ही घटना घडली आहे. सोमवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने तरुणाचा खुन का केला हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र गावकरी एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचे सांगत आहे. आरोपीने तरुणीवर गळ्यावर सपासप वार केला.
🌄
मीडिया रिपोर्टनुसार, वर्ध्याच्या नालवाडी येथून दोन तरुण आणि दोन तरुणी दहेगाव गोसावा येथे आले होते. त्या दोन मुलींनी मृत तरुणीच्या घराबाहेर येवून तीला आवाज दिला. ती आवाज ऐकताच बाहेर पडली दरम्यान अंगणात आरोपी बसल्याचे तीला समजलेच नाही. मागून येऊन आरोपी मुलाने तीच्या गळ्यावर सपासप वार केला. तीनं आरडाओरड सुरु करताच घरातील लोक धावत बाहेर आले. पीडित मुलगी रक्तबंबाळ झाली आणि जमिनीवर पडली. हे पाहून कुटूंबियांनी तीला उचलून तात्काळ रुग्णालयात दाखल केल.
🌄
सेवाग्राम रुग्णालयातील रुग्णालयात उपचार सुरु असताना तीनं प्राण सोडला. डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना गावकऱ्यांच्या मदतीने चौघांनाही पोलीसांनी अटक केले आहे. या घटनेअंतर्गत गावकऱ्यांनी कडक कारवाईची मागणी केली आहे. पोलीसांनी चौघांना कोठडीत ठेवले आहे.या घटनेमुळे जिल्हा हादरला आहे. पोलीस या घटनेअंतर्गत चौकशी करत आहे.