गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठातील एनएसएस कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेविकांना राष्ट्रपती पुरस्कार #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase
0


गडचिरोली:- गडचिरोलीमधील गोंडवाना विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पवन नाईक आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेविका जानव्ही पेद्दीवार यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.


राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी दोन एनएसएस राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे पहले विद्यापीठ म्हणून गोंडवाना विद्यापीठाला मान मिळाला आहे.


डॉ. पवन नाईक व जानव्ही पेद्दीवार यांच्या राष्ट्रीय स्तरावरील निवडीमुळे गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संपूर्ण महाराष्ट्रात अभिनंदन होत आहे. समाजाप्रती करण्यात आलेल्या या कार्यामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात दोघांनीही आपली छाप सोडली आहे. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी सुध्दा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पवन नाईक व स्वयंसेविका जानव्ही पेद्दीवार व संचालक डॉ. श्याम खंडारे तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)