राष्ट्रीय महामार्गासाठी नाले, तलावातून रेतीचे नियमबाह्य उत्खनन #chandrapur #Korpana

Bhairav Diwase
0

नागरिकांचा आरोप

कोरपना:- राजुरा ते गोविंदपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 343(B)चेन्नई काम युद्धपातळीवर सुरू आहे.या मार्गाच्या कामासाठी कोरपना तालुक्यातील नाले व तलावातील गौणखनिज वापरले जात आहे. गौणखनिजाचे उत्खनन व नियमबाह्य वाहतुकीमुळे रस्त्यांची अक्षरशः वाट लागत असून,डांबरीकरणाच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडत आहे.खनिकर्म विभागाकडून 1 जानेवारी 2023 ते 30 सप्टेंबर पर्यंत नाले व तलावातील रेती,दगड,माती,मुरूम वाहतुकीसाठी परवानगी 'जीआरआयएल' कंपनीला दिली असली तरी सदर कंपनीकडून अटी व शर्तीचे भंग करून उत्खनन केले जात असल्याचे आरोप होत आहे.

पाण्या प्रवाहातील रेती काढण्याची परवानगी नाही,मा.जिल्हाधिकारी यांनी यांना फक्त मुरूम, दगड काढण्याची परवानगी दिल्याची माहिती आहे.असे असताना मात्र सिमांकन व पंचनामा न करता स्वतः आपल्या मर्जीनुसार मिळेल तेथून माल उपसा करण्याचे काम झपाट्याने सुरू आहे.आणि सदर कंपनी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचे खळबळजनक आरोप नागरिकांकडून होत आहे.

सुर्योदयापासून सुर्यास्तपुर्वी उत्खनन करायला पाहिजे,असे बंधन असताना,मात्र रात्री जवळपास 12 वाजेपर्यंत तालुक्यातील प्रत्येक नाल्यामध्ये उत्खनन सुरू असल्याचे दिसून येत आहे. देवघाट असो,धामणगाव असो की,चनई नाला असो,रेती उत्खनन होत असल्याने शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे आणि मंजूरी उत्खननापेक्षा अधीक प्रमाणात यांनी दिल्याचे उत्खनन केल्याची चर्चा आहे.

तसं पाहिलं तर राजुरा ते गोविंदपूर,या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रारंभापासूनच वादात सापडले असून जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या गौणखनिज उत्खननाच्या परवानगीचा गैरफायदा घेत 'जीआरआयएल' कंपनीकडून नियमांची ऐशीतैशी केली जात आहे.प्रशासनाकडून कंत्राटदार कंपनीला मोकळे रान सोडण्यात आले की काय ? अशी शंका व्यक्त होता असून कारवाईकडे डोळेझाक केले जात असल्याचे आरोप होत आहे. आतातरी याची चौकशी खणिकर्म विभाग करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)