कंत्राटी भरतीवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठी घोषणा #chandrapur #Mumbai

Bhairav Diwase
0


एजन्सी नव्हे थेट सरकारकडून होणार प्रक्रिया


मुंबई:- पहिली कंत्राटी भरती शरद पवार यांच्या एनसीपीने शिक्षण विभागात पहिली कंत्राटी भरती सुरु करण्यात आली. 2010 साली अशोक चव्हाण यांनी पहिला जीआर काढला. यामध्ये वाहन चालक, तांत्रिक, लिपिक, शिपाई पदांचा जीआर काढण्यात आला.1 सप्टेंबर 2021 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आरएफपीला सरकारची मान्यता मिळाली. मसूदा मंजुर झाला, निवदा निघाल्या. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सहीचा कागद दाखवत कंत्राटी भरतीला मान्यता मिळाल्याचा आरोप केला.हे संपूर्ण पाप कॉंग्रेसचं, उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आहे. आमच्याही काळात कंत्राटी लोकं घेतली आहे. पण आता विरोधक आंदोलन करत आहेत. त्यांना लाज, शरम वाटली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.मुंबईत सात दहा हजार पोलीस कमी पडू शकतात. पोलीस सुरक्षा महामंडळ ट्रेनिंग दिलेले कॅन्डीडेट ३ हजार मुंबईत वापरले जातील. त्याचा पगार मुंबई पोलिस यातून केला जाणार. एकुणच तरूणाईत असंतोष करून अराजक परिस्थितीत करण्साचे काम केले जात आहे. 9 एजन्सी माध्यमातुन जे काम केले जाणार त्याबाबत जीआर रद्द केला जाईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली. इतर विभागात जनरल कंत्राट भरती सुरू राहील - ज्या एज्नसी माध्यातून भरती केली जाणार होती ती फक्त रद्द केली, असे ते म्हणाले.


मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांच्या पापाचं ओझं आपण का उचलायच? असा प्रश्न मी त्यांना विचारला. आम्ही कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला. युवकांची दिशाभूल केल्याबद्दल कॉंग्रेस, उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने माफी मागितली पाहिजे. नाहीतर आम्ही त्यांना जनतेसमोर उघडे पाडू अशा इशारा फडणवीसांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)