शिवसेना पक्षातर्फे"होऊ द्या चर्चा" अभियान
पोंभूर्णा:- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात "होऊ द्या चर्चा" हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन पोंभूर्णा तालुक्यात पक्षप्रमुखांच्या आदेशाने ०३ आक्टोबर ते १० आक्टोबर च्या दरम्यान "होऊ द्या चर्चा" अभियान राबविण्यात येत असून दि. ०३ आक्टोबर ला पोंभूर्णा शहरातील प्रभाग क्र.१० मधील सामाजिक सभागृहात व घनोटी तुकुम व सोनापूर येथे अभियान घेण्यात आले.
यावेळी केंद्र सरकार व राज्यसरकारच्या बोलघेवड्या योजनांचा फंडाफोड येथील स्थानिक नेत्यांनी व पदाधिकारी केला. वाढलेली महागाई, बेरोजगारी, विदर्भातील शेतकरी आत्महत्या, कंत्राटी पद्धतीने घेत असलेल्या शासकीय पद भरत्या व जनतेला दिलेल्या थोतांड आश्वासनावर जनता चिडलेली असून येत्या निवडणुकीत जनता व नवीन पिढीतील युवक माफ करणार नाही असे शिवसेना उपनेते तथा मुंबई महानरपालिकेचे नगरसेवक मनोज जामसूटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, युवासेना मुंबई समन्वय जाधव, शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार,महिला आघाडी तालुका प्रमुख किरण डाखरे,नगरसेवक बालाजी मेश्राम, युवासेना शहर प्रमुख महेश श्रीगिरीवार,यांनी उपस्थित आजच्या अभियांनातील नागरिकांना संबोधित केले.
यावेळी घनोटी तुकुम ग्रामपंचायतचे सरपंच पवन गेडाम, कालिदास उईके, नरेश कोडापे,कांताबाई मेश्राम, भाविका मडावी, वेळवाचे उपसरपंच जितेंद्र मानकर, अतुल जाधव,आष्टाचे उपसरपंच रमेश कुभरे,किशोर डाखरे, प्रफुल दिवसे,रवींद्र ठेंगने, आदित्य पोतराजे,अंकुश गव्हारे, निकेष देऊरमले, सहील नैताम,विकास गुरूनुले, राकेश मोगरकर,सूरज कावडे,प्रकाश कांनपेललीवार,प्रवीण सातपुते, प्रफुल गव्हारे, राकेश श्रीगिरीवार, अक्षय सोनुले, कार्तिक सूरजागडे, बजरंग बल्लावार,विशाल नीलमवार,निखिल कोसरे, व आदी मोठेसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.