गुराख्यांच्या सुरक्षेचे वनविभागाने दिले धडे #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase

उमरी पोतदार येथे गुराख्यांच्या सुरक्षेसाठी कार्यशाळा
पोंभूर्णा:- वन्यजीव सप्ताहानिमित्त पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता गुराख्यांच्या सुरक्षेसाठी वनपरिक्षेत्र बल्लाशाह,उपक्षेत्र उमरी पोतदार आणि इको प्रो संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुराख्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा नुकतेच घेण्यात आली.चराईसाठी जंगलात गुरे घेऊन जाणाऱ्या गुराख्यांवर होणारे हल्ले हि मोठी समस्या असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने कार्यशाळेचे आयोजन करून गुराख्यांनी कोणती खबरदारी घ्यावी ह्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बल्लाशाह वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, प्रमुख मार्गदर्शक ईको प्रो चे बंडू धोत्रे, प्रमुख अतिथी सरपंच ठामेश्वरी लेनगुरे,क्षेत्र सहाय्यक अब्बास खाॅन पठाण,क्षेत्र सहाय्यक बावणे, पोलिस पाटील नारायण थेरे,वन समितीचे अध्यक्ष राजेश्वर परचाके,रत्नाकर देवईकर, गुलाब सिडाम,नंदकिशोर जुमनाके यांची उपस्थिती होती.

वन्यजीवाचे मानवावरील हल्ल्याचे वाढते प्रमाण हा अत्यंत चिंतेचा व गंभीर विषय आहे.मानवाची व पाळीव प्राण्यांची जीवित हानी होणार नाही ते थांबविण्यासाठी वन्यप्राण्याच्या जवळ जाणारा घटक म्हणजे चराईसाठी जंगलात जाणारे गुरे व गुराखी असल्याने प्रामुख्याने गुराख्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने केलेले उपाययोजना व बचावाचे धडे ह्याची प्रत्याक्षीकेच्या माध्यमातून गुराख्यांना कार्यशाळेतून मार्गदर्शन करण्यात आले.वन्यप्राण्यांचे वाढते हल्ले पाहता गुराखी गुरांना जंगलामध्ये नेतांना काय खबरदारी घेतली पाहिजे या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अब्बास खान पठाण यांनी तर आभार प्रियंका अंगलवार यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनरक्षक सुरेंद्र देशमुख,राकेश बुरांडे,धर्मेंद्र मेश्राम व वनरक्षक,वनकर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.