वर्षभर काम व योजनांमध्ये पहिले प्राध्यानासाठी नियोजन
पोंभूर्णा:- पंचायत समिती पोंभूर्णा अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायतीतील विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनस्तरावर विविध उपक्रमात पहिले प्राध्यानासाठी नियोजन करण्यासाठी पंचायत समिती सभागृहात महिला सक्षमीकरण संवाद व उपाय कार्यक्रम घेण्यात आले.शासनस्तराव अनेक योजना कार्यान्वित करण्यात येतात मात्र अनेकांना या योजनेची माहीती होत नाही.विधवा महिलांना स्वाभिमानी जीवन जगता येईल त्यांच्या सक्षमीकरणासाठी वर्षभर कामाची व्यवस्था करता येईल व शासनाच्या विविध योजनांमध्ये प्राथमिकता देण्याच्या संबंधाने गट विकास अधिकारी सुनीता मरस्कोले यांनी पुढाकार घेऊन विधवा, घटस्फोटीत महिलांशी संवाद साधत त्यांच्या सक्षमीकरणासाठी गावात रोजगार प्राप्त करण्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायतींना नियोजन करण्याचे सुचवले आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोले, जामखुर्दचे सरपंच धनराज बुरांडे, भालचंद्र बोधलकर,रोहिणी नैताम, विस्तार अधिकारी अमरदिप खोडके यांची उपस्थिती होती.
विधवा घटस्फोटीत म्हणून जगणाऱ्या महिलांचे आयुष्य मोठे खडतर असते.गावात काम नसल्याने त्यांच्यावर आर्थिक परेशानी निर्माण होते.कुणी कमावता नसल्याने परिस्थितीमुळे आर्थिक ओढाताण सहन करणाऱ्या या महिलांना मुला बाळांचे संगोपन,शिक्षण यांचीही मोठी जबाबदारी असते.
आईवडिलांचा,सासुसासऱ्यांचा सांभाळ करतांना मोठे हाल अपेष्टा सहन करावे लागते.गावात काम नसल्याने त्यांची मोठी परवड होत असते.हि समस्या गंभीर असल्याने गटविकास अधिकारी यांनी पोंभूर्णा तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीतील विधवा, घटस्फोटीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक आराखडा तयार करून त्यांना वर्षभर काम मिळेल यासाठी ग्रामपंचायतीशी समन्वय साधून सुचना दिल्या.ग्रामपंचायतने अश्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसणाऱ्या विधवा घटस्फोटीत महिलांचे स्वतः पालकत्व स्वीकारून त्यांच्या कामासाठी ठराव घेऊन अश्या महिलांना वर्षभर कामाची तजवीज करून द्यावी.शासनाच्या वतीने सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामावर त्यांना बारमाही रोजगाराची व्यवस्था करून द्यावी, घरकुल योजनेत प्राधान्यक्रम देत घरकुल देण्यात यावे.सर्व शासकीय योजनेत लाभ देण्यात यावा आदी विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.उपस्थित सरपंच, ग्रामसेवकांना या विषायान्वये कार्यवाही करण्याच्या सुचनाही देण्यात आले.यावेळी तालूक्यातील पाचशेहून अधिक विधवा घटस्फोटीत महिलांची उपस्थिती होती.