कोरपणा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लागणार धीरे का झटका जोर से? #Chandrapur

Bhairav Diwase

👍
कोरपना:- गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर गेल्याचे चित्र दिसून येत आहे. यात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याच्या हेतूने, पक्ष फोडा फोडीचे काम सुरू आहे. यातच राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले नेते कुठेही केव्हाही प्रवेश करतात मात्र कार्यकर्ता हा प्रामाणिक असतात असे म्हणतात कोणताही पक्षाचा मुख्य कणा हा कार्यकर्ता असतो मात्र येथील शरद पावर गटाचे व अजित पवार गटाटले कार्यकर्ते कुणाला सोडचीट्टी द्यायची व कुणाला नाही या संभ्रमात येऊन पडले.

👍
 अजित पवार गटात अनेक पदाधिकारी आल्याने कार्यकर्त्यांची मात्र गळचेपी झाली आहेत अश्यातच अनेक कार्यकर्ते संभ्रमात पडले की, शरद पवार साहेब यांच्या गटात राहायचं की अजितदादा पवार यांच्या गटात, हा प्रश्न अनेक युवा , ज्येष्ठ कार्यकर्त्यांना पडला. आणि त्यात चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार खासदार नसल्याने आता कुठे जायचं यात अनेक कार्यकर्त्यांची गळचेपी झाली. अश्यातच राष्ट्रवादीचे आजी माजी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते कुठल्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा या ठिकाणी सुरू आहे.
यावर कार्यकर्ते व पदाधिकारी दुसऱ्या पक्षात जाणार की फुसका बार निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे