सबसे कातिल गौतमी पाटील येणार चंद्रपूर-गडचिरोलीच्या सीमेवर #chandrapur #saoli #gautamiPatil




चंद्रपूर:- गौतमी पाटील (Gautami Patil) या नावाची वेगळी ओळख करुन द्यायची काही गरज नाही. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात सध्या गौतमीचीचं हवा पाहायला मिळते. आपल्या दिलखेचक अदांनी आणि तडफदार लावणीने गौतमीने तरुणाईला वेड लावले आहे. त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांना तौबा गर्दी पाहायला मिळते. चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाळ खुर्द येथे गौतमीच्या ठुमक्यांचा कार्यक्रम घेत आयोजकांनी पहिला नंबर लावला आहे.



आज १९ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील व्याहाळ खुर्द येथे गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमासाठी दोन्ही जिल्ह्यांतील गौतमीप्रेमींमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. कार्यक्रमाच्या पासेस संपल्या असून, आम्हाला पास मिळतील का, अशी विचारणा होऊ लागली आहे.


गौतमीचे बॅनर्स लागले गावोगावी


दोन्ही जिल्ह्यांतील तरुणाईत गौतमीचे ठुमके बघण्यासाठी 'जोश' निर्माण झाला आहे. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याला वैनगंगा नदीचे सीमाबंधन आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गावात दारूची अनेक दुकाने आहेत. दारूबंदी असलेल्या गडचिरोलीतील तळीरामांसाठी या गावातील दारू दुकाने वरदान ठरली आहेत. वैनगंगेचे मोठे नदीपात्र असलेल्या या गावात बरेच जण रेतीविक्रीच्या कामात गुंतले आहेत.


दारूची भरपूर दुकानं असलेल्या व्याहाळमध्ये आता गौतमीच्या ठुमक्यांच्या तालावर नाचण्याचे वेध अनेकांना लागले आहेत. गावोगावी याचे बॅनर्स लागले आहेत. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी तोबा गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था करताना पोलिस विभागाचीही दमछाक होणार आहे.


व्याहाळ येथे १९ ऑक्टोबर रोजी होणार असलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजुरकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, संदीप गड्डमवार, नामदेव किरसाम आदींची उपस्थिती राहणार आहे. व्याहाळमधील गौतमी पाटील यांच्या लावणी महोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन निखिल सुरमवार व मित्र परिवारांनी केले आहे.


भव्यदिव्य सेटअप...


गौतमी पाटील यांचा कार्यक्रम 'न भूतो न भविष्यति' करण्यासाठी निखिल सुरमवार व मित्रमंडळी गेल्या महिनाभरापासून नियोजन करत आहेत. सुरमवार यांची मुख्य रस्त्याला लागून पाच एकर जागा आहे. याच मैदानावर गौतमी पाटीलचे ठुमके बघायला मिळणार आहेत. हा कार्यक्रम पूर्णतः मोफत आहे. कार्यक्रमासाठी औरंगाबाद येथील साउंड सिस्टिम बोलाविण्यात आला आहे.


लाखो रुपयांच्या बजेटच्या या कार्यक्रमासाठी जोरदार नियोजन सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच गौतमी पाटील येत आहे. त्यामुळे तरुणाईसह गौतमी पाटील यांच्या हजारो चाहत्यांमध्ये मध्ये 'हाऊ इज द जोश' बघायला मिळत आहे. कार्यक्रमासाठी जिल्हा पोलिस मुख्यालयातून परवानगी घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने