धनगर जमात आरक्षण अंमलबजावणीसाठी दिले जिल्हाभर निवेदन; सकल धनगर जमात संघटना

Bhairav Diwase
0
धनगर जमात आरक्षण अंमलबजावणीसाठी दिले जिल्हाभर निवेदन; सकल धनगर जमात संघटना.


चंद्रपूर:- धनगर समाजाचा आरक्षण अंमलबजावणी साठी शासनाने 50 दिवसांचा अवधी मागितला त्याला तसेच विविध मागण्यांना घेऊन आज संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले.
शासनाने दिलेली धनगर आरक्षण अंमलबजावणीची मुदत संपले बाबत महोदय आपल्या राज्यात सुमारे अडीच ते तीन कोटी धनगर समाज अस्तित्वात आहे डोंगरदऱ्यात राहणारे भटकंती करून उपजीविका भागवणारे धनगर बांधव आजही विकासापासून वंचित आहे कित्येक पिढ्या ही मागासनेपणाची झाड सोसत आहे भारतीय राज्यघटनेने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात स्थान दिले मात्र गेला सत्तर वर्षांमध्ये सर्वच सरकारांनी आरक्षण अंमलबजावणी पासून फारकत घेतली आज तुमच्या हाती धनगर उद्धाराची संधी आहे धनगर समाजाने राज्यातील विविध ठिकाणी आपण उपोषण केले.धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने धनगर आरक्षणाकरिता उच्च न्यायालयात दाखल याचिकेत याचिका क्रमांक ऍड कुंभकोणी यांची कायम नियुक्ती करणे तसेच न्यायालयात तात्काळ व दैनंदिन सुनावणी करता अर्ज दाखल करणे मेंढपाळांसाठी घोषित केलेला दहा हजार कोटींच्या सहकारी महामंडळाचे जिल्हास्तरीय संस्था स्थापन केले असून लवकरात लवकर सहकार मंडळ महामंडळाची घोषणा करून योजना कार्यान्वित करण्यात यावी व तसेच स्वतंत्र अध्यक्षाची नेमणूक करावी.जे आदिवासींना ते धनगरांना याप्रमाणे घोषित केलेल्या 1000 कोटी रुपयांच्या 22 योजनांपैकी काही योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या नाहीत व संपूर्ण निधी सुद्धा उपलब्ध झाला नाही त्याबाबत आढावा घेऊन उपाययोजना करणे मेंढपाळावर होत असलेले हल्ले रोखणे व त्यावर स्वतंत्र कायदा आणून त्यांना संरक्षण देणे तसेच महसूल रेकॉर्डमधील आरक्षित चराई कुरणे क्षेत्र वार्षिकी प्रति हेक्टर एक रुपया दर आकारणी करून स्थानिक मेंढपाळांना वाटप करणे.महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेले किल्ले वापगावच्या विकास संवर्धनासाठी सरकारने ताब्यात घेऊन किल्ले वापगाव विकास आराखडा त्वरित तयार करून त्याला मान्यता द्यावी ज्या पद्धतीने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव करण्यासाठी तात्काळ व ठोस पावले उचलण्यात आली त्याच पद्धतीने अहमदनगर जिल्ह्याच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतरासाठी प्रयत्न व अंमलबजावणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश द्यावे. मुख्यमंत्री कोणत्या विशिष्ट समोरच्या नसतात ते सर्वांचे असतात सर्वसमावेशक असतात एका विशिष्ट समाजासाठी आपण खास प्रयत्न करतात धनगर आरक्षणाकडे उदर दाखवत आहे ही बाब अत्यंत खेदजनक आहे आपण तातडीने धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा धनगर समाजाचा संविधानिक मार्गाने चालणारे तीव्र लढायला समोर जाण्याची तयारी ठेवावी काढावी.
  या व इतर मागण्यासाठी आज जिल्हाभर निवेदन व सभा घेण्यात आल्या. यावेळी धनगर जमात सेवा मंडळ, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष डॉ मंगेश गुलवडे, गणपतराव येवले, कोरडे साहेब, संतोष ताल्हण, पवन ढवळे, प्रविण गिलबिले नंदू मोंढे, प्रज्वल गिलबिले, कोरपना साईनाथ बुच्छे, राजुरा गोपाळ बुरांडे, बल्लारपूर कार्तिक दरेकर गोंडपिपरी विठ्ठल गोंडे, वरोरा गजानन शेळके, भद्रावती महादेव बर्डे चिमूर गणेश भुरके ब्रम्हपुरी प्रकाश घोरुडे मुल डॉ तुषार मरलावर, जिवती गोविंद गोरे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, महिला, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)