अयोध्येत दीपोत्सवाचा गिनीज बुक रेकॉर्ड #chandrapur #Ayodhya

Bhairav Diwase
22 लाख 23 हजार दिव्यांनी उजळली अयोध्या नगरी

अयोध्या:- श्रीराम जन्मभूमी अयोध्येत 22 लाख 23 हजार लाख दिव्यांना प्रज्वलित करून गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 22 लाख दिव्यांनी अयोध्या नगरी उजळून निघाली आहे. दीपोत्सव २०२३ द्वारे नवा विक्रम करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात प्रमाणपत्र स्वीकारले आहे.

दरम्यान, अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर पुढील वर्षी २२ जानेवारी २०२४ प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला सरयू नदीच्या काठावर आरती केली.