Top News

तनुश्री आत्राम गडचिरोली विधानसभा लढविण्यासाठी इच्छूक #chandrapur #gadchiroli

गडचिरोली:- अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम गडचिरोली विधानसभा लढविण्यासाठी इच्छूक असून आपल्याला ज्या पक्षाद्वारे तिकीट मिळेल त्या पक्षाकडून निवडणूक लढविण्याची आपली तयारी असल्याचे म्हटले आहे.

एका पत्रपरिषदेत तनुश्री आत्राम Tanushree Atram यांनी गडचिरोली विधानसभा निर्वाचन क्षेत्रावर आपला फोकस असून या मतदार संघात गेल्या काही दिवसांपासून अनेक सामाजिक उपक्रम आपल्या मार्फत राबविले जात असल्याचे सांगीतले. धर्मरावबाबा आत्राम जनसहायता केंद्र या नावाने तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कार्यरत असल्याचेही त्या म्हणाल्या. आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात 35 हजाराहून जास्त लोकांना मोफत आभा कार्ड, पॅन कार्ड व आधार कार्डचे वितरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले. गडचिरोली तालुक्यात जवळपास 40 ग्रामपंचायती अंतर्गत आभा कार्डचे वितरण करण्यात आले.

याशिवाय गरीब रुग्णांकरीता रक्ताची व्यवस्था तसेच कॅन्सरग्रस्त पीडितांना मदत केल्याचे Tanushree Atram तनूश्री आत्राम म्हणाले. यापूर्वी आपण राजकारणात जिल्हा परिषदेच्या निवडणूकीच्या माध्यमातून आलेलो होतो. त्यानंतर केवळ समाजकारण करून लोकांपर्यंत पोहचून लोकांच्या समस्या सोडविल्या. लोकांची इच्छा आपण परत राजकारणात येण्याची असून त्यांच्या प्रेमाखातर आपण गडचिरोली विधानसभेची निवडणूकी कोणत्याही पक्षाकडून किंवा अपक्ष राहूनसुद्धा आपण लढविणार असल्याचे त्यांनी सांगीतले. यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आपण सिनेटची निवडणूक लढविली होती. व प्रचंड मतांनी जिंकली होती, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने