Top News

पोटच्या मुलीला बापानं केला संपवण्याचा प्रयत्न #Washim

वाशिम:- वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील लाडेगाव एक धक्कादायक घटना घडलीय. मुलगी आणि वडिलांचं नातं हे अत्यंत घट्ट आणि जिव्हाळ्याचं नातं असतं. एखादा बाप आपल्या मुलीच्या डोळ्यात कधीच अश्रू बघू शकत नाही. पण लाडेगाव येथील एका बापाने पोटच्या लेकीला संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय.

मुलीवर चाकू हल्ला करून तिला गंभीर जखमी केलं आहे. ही घटना लाडेगाव ऑटो पॉईंट चौकात घडलीय. बापाने मुलीला संपवण्याचा प्रयत्न का केला, त्या मागे काय कारण आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये.


मानोरा तालुक्यात असलेल्या हिवरा येथील १६ वर्षीय मुलगी लाडेगाव ऑटो पॉईंट चौकात उभी होती. ही मुलगी पिप्री मोडक येथे जाणार होती. त्यावेळी या मुलीचे वडील तेथे आले आणि त्यांनी मुलीवर चाकू हल्ला चढवला. या हल्ल्यात मुलीच्या गळ्यावर आणि पाठीवर वार झाल्याने ती गंभीर जखमी झालीय. जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू हल्ला करणाऱ्या बापाला ताब्यात घेतले आहे.दरम्यान घटनेचा अधिक तपास धनज पोलीस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने