चंद्रपूर पालकमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरून व्हिडीओ व्हायरल #chandrapur #Korpana

Bhairav Diwase


कारवाई करण्याची भाजयुमोची मागणी



चंद्रपूर:- दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ रोजी गडचांदूर निवासी बाबार मस्की यांनी ना. सुधीर मुनगंटीवार वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा तसेच शासनाची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने प्रसार माध्यमाद्वारे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केलेला आहे. याबाबत शहानिशा करून संबंधितांविरूध्द कार्यवाही करण्यात यावी यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा संघटन सरचिटणीस मिथिलेश पांडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांची भेट घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरून व्हिडीओ व्हायरल करणार्‍या बाबा मस्की दाम्पत्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले.


विदर्भ भाजप कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष रामदास दुर्योधन यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात निवेदन दिले. गडचांदूर पोलिसांनी भादंवि कलम २९४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. भविष्यात असे धाडस कोणी केल्यास धडा शिकविला जाईल, असा इशारा भाजप नेत्यांनी दिला आहे.



याप्रसंगी जिल्हा भाजयुमो उपाध्यक्ष संदीप पोडे, चंद्रपूर महानगर भाजपा कामगार मोर्चाचे अध्यक्ष सुरजसिंह ठाकूर, उग्रसेन पांडे, उत्तर भारतीय मोर्चाचे सरचिटणीस डॉ. दीपक पाठक, भाजप कामगार मोर्चाचे जिल्हा सचिव योगेंद्र केवट, इंद्रजित सिंग, राजू निषाद, रवी चिल्का, नौशाद सिद्दीकी आदींची प्रमुख उपस्थिती होती.