शिवसैनिकाची चाकूने भोसकून हत्या #chandrapur #Yawatmal #murder

Bhairav Diwase
0


यवतमाळ:- जिल्ह्यात दररोज सरासरी एक खून होत असताना दिवाळीसारख्या सणामध्येही या घटना थांबलेल्या नाहीत. गुरूवारी सर्वत्र दिवाळीचा गजबजाट आणि वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीची धामधूम सुरू असतानाच शिवसैनिकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजता शहरालगतच्या वाघाडी जांब येथे घडली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


योगेश नरहरी काटपेलवार (३६) रा. देवीनगर लोहारा असे मृताचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. योगेशचा खून जुन्या वादातून झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी तत्काळ तपास हाती घेत मारेकरी कोण याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी संजय पुज़लवार, ग्रामीण ठाणेदार प्रकाश तुणकलवार, सहायक निरीक्षक राहुल शेजव आदींनी भेट दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)