Top News

CSTPS चंद्रपूर येथील कन्व्हेअर बेल्ट मधील प्रकल्पग्रस्त कामगारांना मिळणार न्याय- सुरज ठाकरे

CSTPS चंद्रपूर येथील कन्व्हेअर बेल्ट मधील प्रकल्पग्रस्त कामगारांना मिळणार न्याय- सुरज ठाकरे

पालकमंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे श्री. सुरज ठाकरे यांनी केली मागणी


चंद्रपूर:- सविस्तर वृत्त असे की, CSTPS चंद्रपूर येथील कन्व्हेअर बेल्ट च्या कामाचा कंत्राट हा भावना एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे असून या कंपनीचे कंत्राटदार हे एकूण ८३ कामगारांमधून ६४ कामगारांना नियमितपणे २६ दिवस काम देऊन फक्त जाणीवपूर्वक प्रकल्पग्रस्त १९ कामगारांना १५ दिवसाचे काम देऊन या कामगारांवर आतापर्यंत अन्याय करीत आले. जेव्हा की सर्वप्रथम प्रकल्पग्रस्त कामगारांना या कंपनीमध्ये प्रथम प्राधान्य देण्याचे आश्वासन सीएसटीपीएस प्रशासनाने प्रकल्पग्रस्त कामगारांना दिले होते. परंतु या कामगारांना डावलून उलट फक्त प्रकल्पग्रस्त कामगारांवरच अन्याय केला जात असल्याची तक्रार कन्व्हेअर बेल्ट येथील कामगारांनी जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांच्याकडे केली. यानंतर क्षणाचाही विलंब न करता श्री. सुरज ठाकरे यांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत दिनांक- २७ नोव्हेंबर २०२३ ला चंद्रपूर येथील नियोजन भवन मध्ये मा. कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जि. चंद्रपूर श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भेट घेऊन कामगारांची व्यथा मांडली. यानंतर संबंधित प्रशासनाला संपर्क करून तथा जय भवानी कामगार संघटने तर्फे कागदोपत्री पाठपुरावा करून तात्काळ या सर्व कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याकरिता CSTPS प्रशासनाला ठणकावून सांगण्यात आले. व या संपूर्ण प्रकल्पग्रस्त कामगारांना नियमितपणे २६ दिवस काम देण्याचे सांगण्यात आले. यासह या कंपनीचे सुपरवायझर हे कामगारांना कमरेखालच्या शिव्या देऊन कामगारांचे मानसिक खच्चीकरण करून ज्या आवारामध्ये वाघाचा धुमाकूळ असतो त्या परिसरामध्ये रात्री च्या वेळेस कुठल्याही प्रकारची सेफ्टी न देता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवून कामगारांचा जीव धोक्यात टाकत असल्याची देखील बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. भविष्यात जर का एखादी दुर्घटना घडली तर निश्चितच याला भावना एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ही जबाबदार राहील असे खडे बोल या वेळेस कंपनी प्रशासनाला सुनावण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने