पालकमंत्र्यांनी केली राजुराच्या व्हॉलीबॉल पटूंची मागणी पूर्ण; सुरज ठाकरेंच्या प्रयत्नांना यश
राजुरा:- राजुऱ्यामध्ये केसरी नंदन क्रीडा मंडळाकडून अनेक वर्षांपासून व्हॉलीबॉल सामने सराव व प्रशिक्षण घेण्यात येते क्रीडा मंडळाला राजुरा मध्ये प्रॅक्टिस करण्याकरता आज पर्यंत कुठल्याही प्रकारची स्थायी जागा उपलब्ध झाली नाही
नुकताच राजुरा मधील जिल्हा परिषद शाळेच्या ग्राउंड वर मंडळाद्वारे व्हॉलीबॉल प्रशिक्षण व सराव करणे सुरु झाले
स्थानिक राजुरातील तरुणांद्वारे मोठ्या प्रमाणावर खेळण्यात येणार्या या खेळाकडे लक्ष नसल्याने या खेळाडूंना कुठल्याही प्रकारचे प्रोत्साहन मिळत नसल्याचे खेळाडूंनी सांगितले तसेच
जिल्हा परिषद शाळे च्या ग्राउंड वर सुरू असलेल्या या खेळाकरिता *लाईटची व्यवस्था* करून देण्याची मागणी क्रीडा मंडळाने व खेळाडूंनी सुरज ठाकरे यांच्याकडे केली.
तात्काळ सुरज ठाकरे यांनी त्यांची ही मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंत वैयक्तिकरित्या खेळाडूंना सोबत घेऊन जाऊन सांगितली व क्षणाचाही विलंब न करता माननीय पालकमंत्री यांनी खेळाडूंची ही मागणी पूर्ण करण्यासंदर्भातील आदेश जिल्हा परिषद चंद्रपूर येथील संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
राजुर्यातील व्हॉलीबॉल क्रीडापटूंनी याकरता श्री.सुरज ठाकरे व श्री सुधीर मनगंटीवार यांचे मनापासून आभार मानले आहेत.