Top News

प्रथमच पार पडले रक्तदान शिबीर

प्रवास बहुउद्देशीय संस्था मोहाळी यांचे उपक्रम
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी(नले) येथे 26 नोव्हेंबर भारतीय संविधान सम्मान दिनाचे औचित्य साधुन " प्रवास बहुउद्देशीय संस्था, मोहाळी (नलेश्वर) ता. सिंदेवाही, जिल्हा. चंद्रपूर " यांचे वतीने मोहाळी गावात प्रथमच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात स्थानिक व परिसरातील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर शिबीर शासकीय रक्तपेढी चंद्रपूर यांच्या मदतीने संपन्न झाले. या शिबिरात तब्बल 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये अनेक महिला, प्राध्यापक, ग्रामवासी, विद्यार्थ्यांचा समावेश होता. रक्तदान शिबिराला "प्रवास बहुउद्देशीय संस्था, मोहाळी (नले.) चे अध्यक्ष प्रा. पराग देविदास दोडके, उपाध्यक्ष श्री. नरेश भुजंगराव आत्राम, सचिव श्री. चंद्रशेखर माणिकराव घोडमारे, सहसचिव गणेश प्रभुदास चौधरी, कोषाध्यक्ष नागसेन जगन्नाथ घोनमोडे, सदस्य अरविंद बालाजी नन्नावरे, मोनल भय्याजी लोणारे, प्रफुल उष्टुजी गौरकार, आकाश नकटुजी श्रीरामे, रामेश्वर माणिकराव घोडमारे, कृणाल जगन्नाथ घोनमोडे, विशाल देवदर्शन गेडाम, राजेंद्र कुशबराव चावरे, नितेश दुमाजी नन्नावरे, विनोद दुमाजी नन्नावरे व मंगेश श्रीरंग वाघमारे यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने