आदिवासी समुदायात संविधानाची जनजागृती #chandrapur

Bhairav Diwase

जनहित फाउंडेशनचा उपक्रम

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही

सिंदेवाही:- तालुक्यातील ताडोबा बफर झोन जंगलालगत असलेलं व जिथं स्वातंत्राच्या अमृत महोत्सवी वर्षातही दळणवळणाची सुविधा नाही.असं हे पिपरहेटी गाव आहे.त्या गावात जनहित फाउंडेशनची चमू समुदायाचा अभ्यासाकरिता गेली व त्या समुदायावर चिकित्सात्मक परीक्षण करून समुदायातील प्रत्येक घटकांना विचारात घेऊन त्याच्या बोलिभाषेत व लोककलेचा वापर करून “संविधान जनजागृती ” हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन करून दिनांक 25 नोव्हेंबर 2023 ला रोज शनिवारला सायं.६:०० वा.संविधान सन्मान सप्ताहाच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला.
तेव्हा या कार्यक्रमात भारतीय संविधान या विषयांवर जनहित फाउंडेशन च्या चमुनी भारतीय संविधान काय आहे ? तुमचे हक्क तुम्हांला कोण प्रदान करते ? लोकशाहीचे महत्व,ग्रामसभेचे महत्व,मतदानाचा अधिकार,शिक्षणाचा अधिकार,मूलभूत अधिकार यावर मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली.
हा उपक्रम पहिल्यांदाच आमच्या गावात आजपर्यतःच्या आयुष्यात जनहित फाउंडेशन ने राबवून आम्हांला आमचे अधिकार,लढा,सोबतच शिक्षणाचा धडा या माध्यमातून पटवून सांगितला आहे.हा खूप चांगला कार्यक्रम त्यांनी घेतला त्यांचे मी आभारी आहे.असे सौ.गेडाम ताई, सरपंच पिपऱहेटी यांनी व्यक्त होतांना सांगितले.तसेच भारतीय संविधान आम्हांला आमचे हक्क देते,संधी देते,याची जाणीव करून दिली व समुदायाला जागृत करून स्वतःची भूमिका बजावून सांगितली.त्याबद्दल जनहित फाउंडेशन च्या चमूचं स्वागत व अभिनंदन करतो.व असेचं नवनवीन उपक्रम राबवून आम्हांला सहकार्य करत राहावे.ही अपेक्षा व्यक्त करतो.असे मा.आत्राम साहेब पो.पा.पिपरहेटी यांनी याप्रसंगी सांगितले.
🔜

त्याचप्रमाणे उपस्थित नागरिकांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकाची प्रत वितरीत करून लोक सहभागातून सर्वांनी वाचन सामूहिक वाचन केले. या कार्यक्रमाला पिपरहेटी ग्रामवासियांनी उत्कृष्ठ असा सहभाग नोंदवून मोलाचे सहकार्य केले.तसेच यावेळी आक्रोश खोब्रागडे,अध्यक्ष ज.फा.,तथागत कोवले,सचिव ज.फा.,विशाल गेडाम उपाध्यक्ष ज.फा.विरेंद्र मेश्राम कोषाध्यक्ष ज.फा., किशोर बोरकर सदस्य,सत्यपाल मेश्राम सदस्य,रितेश सूर्यवंशी सदस्य उपस्थित होते.त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला सनम मेश्राम,समीर कोवले,अजित खोब्रागडे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन तथागत कोवले व आभार प्रदर्शन रितेश सूर्यवंशी यांनी केले.