सास्ती येथे राजुरा तालुकास्तरीय श्रीगुरुदेव प्रचारकांचा मेळावा संपन्न.

Bhairav Diwase
0
सास्ती येथे राजुरा तालुकास्तरीय श्रीगुरुदेव प्रचारकांचा मेळावा संपन्न.

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे विचार साहित्य समाजहिताचे- ॲड.राजेंद्र जेनेकर


राजुरा:- सास्ती येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ,दत्त जयंती उत्सव समिती व गावकरी मंडळीचे वतिने श्रीगुरुदेव प्रचारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाध्यक्ष म्हणून ॲड. राजेंद्र जेनेकर केंद्रीय सदस्य प्रचार विभाग गुरुकुंज आश्रम तर प्रमुख अतिथी म्हणून बळीराम बोबडे, ॲड.सारीका जेनेकर महिलाप्रमुख चंद्रपूर जिल्हा,सुनिता रासेकर अध्यक्ष पांढरपौनी,बेबीबाई धानोरकर अध्यक्ष वरुर,मिनाबाई धोटे अध्यक्ष नलफडी,सुरेश चन्ने,मनोहर बोबडे,विनायक सोयाम, रामदास चौधरी,रमेश मादासवार प्रचारक, देवराव परसुटकर अध्यक्ष साखरवाही,मारोती डोहे अध्यक्ष अहेरी, प्रेमिला काकडे आदींची उपस्थिती होती.

मेळाव्यात चिंचोली चे बबन भगत,रामदास कावडकर रामधून महत्व,पांढरपौनी येथील सुनिता रासेकर महिलासंघटन, वरुर रोड येथील मयूर जानवे युवकसंघटन, बेबीताई धानोरकर, इंदिरानगर चे रमेश भोयर यांनी संघटनशक्ती, रामपूर चे देविदास वांढरे यांनी ग्रामगीता परिक्षेचे फायदे,शिलाबाई लांडे सामु.प्रार्थणा,धिडशी येथील प्रेमिला काकडे यांनी शिक्षणाचे महत्व,भुरकुंडा येथील रमेश मादासवार श्रीगुरुदेव मासिक कार्य, साखरवाही येथील देवराव परसुटकर भजनीमंडळींची सेवा, पंचाळा येथील विनायक सोयाम यांनी मंडळाचे कार्य, प्रचारक रामदास चौधरीने सेवा मंडळ नोंदणी बाबत असे एकूण 20 प्रचारकांनी आपआपले कार्यअहवाल जाहिरपणे मांडले. यावेळी ॲड.सारीका जेनेकर,सुरेश चन्ने यांनी समयोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमाध्यक्ष ॲड. राजेंद्र जेनेकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार व साहित्य आधुनिक पिढीला मार्गदर्शक असून समाजहिताचे आहे असे विचार व्यक्त केले,यावेळी बळीराम बोबडे यांचा भजनसेवा,विनायक सोयाम, रामदास चौधरी यांचा मंडळाचे कार्य,रमेश मादासवार यांचा श्रीगुरुदेव मासिक कार्य, मयूर जानवे युवकसंघटनकार्य बाबत उपस्थित प्रचारकांचा ग्रामगीता ग्रंथ देवून पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दिवंगत कार्यकर्ते वासुदेव बुटले,बापुजी मांडवकर, सुरेश काळे, नंदकिशोर लोहबळे,जगन्नाथ चन्ने,विश्वनाथ पोशट्टीवार, काशीनाथ राऊत, सुभद्रा गायकवाड, नानाजी डोंगे, चंपत कावडकर, महादेव जानवे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सुत्रसंचलन रोहीत वैरागडे यांनी तर इंदिराबाई कुडे अध्यक्ष यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरीत सौ.अनिता गाडगे, राजश्री राजुरकर, छाया मोहितकर, सुधाकर बवणे, संतोष पवनकर, आनंदराव लांडे, मारोती चोखारे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)