कोरपना:- कोरपना तालुक्यातील नारंडा गावात विद्युत विभागाच्या अनेक समस्या असून सदर समस्यांचे निवारण करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता ढोकणे सर यांच्याकडे केली आहे.
नारंडा गावातील अनेक विद्युत पोल वाकलेले असून त्या विद्युत पोल ऐवजी दुसरे विद्युत पोल बसविणे,गावातील अनेक घरांवरून विद्युत तार गेलेले आहेत ते विद्युत तार काढणे,गावातील अनेक विद्युत तार रस्त्यावर खाली आलेले आहे ते वरती घेणे,२ फेज विद्युत लाईन ३ फेज करणे,गावात व्होल्टेज वाढविणे,वाढीव डीपी देणे इत्यादी प्रकारच्या मागण्या भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी ढोकणे यांच्याकडे केली.
यासंदर्भात उपविभागीय अभियंता ढोकणे यांनी नारंडा गावात येऊन सदर समस्येची पाहणी केली.यावेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,कनिष्ठ अभियंता संतोष शिंदे, नारंडा ग्रामपंचायतचे उपसरपंच बाळा पावडे,प्रवीण हेपट,नामदेव पाटील घुगुल,दशरथ सातपुते,संदीप गोरे उपस्थित होते.