Top News

अखिल भारतीय मादगी समाज संघटना तालुका शाखा पोंभूर्णा‌ तर्फे महामानवास अभिवादन


पोंभुर्णा:- भारतीय राज्यघटनेचे निर्माते महामानव प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अखिल भारतीय मादगी समाज संघटना तालुका शाखा पोंभूर्णा तर्फे आज दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी समाज बांधवांकडून महामानवाच्या प्रतिमेस माल्यार्पन करून सामूहिक पूजन तसेच अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोरगरीब,वंचित,दुर्बल उपेक्षित घटकांना समानतेचा हक्क आणि स्वाभीमानासाठी लढण्याचे बळ दिले.. सर्वांना स्वाभीमानाने जगण्याची व विकासाची समान संधी उपलब्ध करून दिली. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून तमाम भारतीयांना त्यांचे हक्क, अधिकार बहाल करण्याऱ्या, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या प्रज्ञासूर्यास त्यांचे स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले.
यावेळी मादगी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पुरंदर इप्पलवार, गणेश जिल्ल्हेवार, रामदास इप्पलवार, शालीक गोरंतवार, रमेश बोलीवार, रामदास जिल्हेवार, पैकण इप्पलवार, जगदीश गोरंतवार तसेच अखिल भारतीय मादगी समाज संघटनेचे युवा अध्यक्ष रोशन येमुलवार, कार्याध्यक्ष भूषण इप्पलवार, कार्यकर्ते मारोती जील्हेवार कार्यकर्ते निखिल गोरंतवार, संचित इप्पलवार, व बहुसंख्येने महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने