Gpay, Paytm आणि Phonepe वर तुमचं अकाऊंट 1 जानेवारीपासून होणार बंद, हे आहे कारण? #chandrapur

Bhairav Diwase
0

मुंबई:- कोरोना काळानंतर ऑनलाइन आर्थिक व्यवहारांचे प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आपण सर्व प्रकारचे ऑनलाइन आर्थिक व्यवहार करण्यासाठी ऑनलाइन पेमेंट अ‍ॅप्सचा वापर करतो. त्यासाठी आपल्या पेमेंट अ‍ॅपचा एक विशिष्ट यूपीआय आयडी असतो; पण एकापेक्षा जास्त यूपीआय आयडी तयार झाल्यास ऑनलाइन फ्रॉड होण्याची शक्यता असते.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) इनअ‍ॅक्टिव्ह यूपीआय आयडी ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर तुम्ही एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ UPI आयडीद्वारे ऑनलाइन व्यवहार करत नसाल तर तुमचा यूपीआय आयडी ब्लॉक केला जाईल आणि तो आयडी तुम्हाला पुन्हा वापरता येणार नाही.

तुम्हीदेखील यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) वापरत असाल तर नवीन वर्षात मोठा धक्का बसणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) यूपीआय युझर्ससाठी नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. सरकारने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की निष्काळजीपणामुळे यूपीआय अकाउंट आणि यूपीआय आयडी बंद होऊ शकतो. या निर्णयामुळे अमेझॉन पे, गुगल पे, फोन पे, पेटीएम, मोबीक्विक यांसारख्या अ‍ॅप्सच्या युझरवर परिणाम होईल.

एनपीसीआयच्या गाइडलाइनमध्ये काय म्हटलं आहे?

एनपीसीआयने आपल्या नवीन गाइडलाइन्समध्ये म्हटलंय, की यूपीआय युझर्सनी त्यांच्या यूपीआय खात्यातून एक वर्ष कोणताही व्यवहार केला नाही तर त्यांचा यूपीआय आयडी बंद केला जाईल. एखाद्या युझरने या कालावधीत त्यांचा बँक बॅलन्सदेखील तपासला असेल तरी त्याचा आयडी ब्लॉक केला जाणार नाही.

एनपीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, 'डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात सुरक्षित व्यवहार अनुभव सुनिश्चित करण्यासाठी ग्राहकांनी बँकिंग प्रणालीमध्ये नियमितपणे त्यांच्या माहितीचे पुनरावलोकन आणि पडताळणी करणं आवश्यक आहे. युझर्स त्यांचा खात्याशी लिंक केलेला मोबाईल नंबर बदलतात .परंतु त्या नंबरशी लिंक केलेलं यूपीआय खातं बंद करत नाहीत.'

यूपीआय युझर्सना एक सुरक्षित अनुभव प्रदान करणं हा या गाइडलाइन्सचा उद्देश आहे. या वर्षीही अनेक यूपीआय खाती इनअ‍ॅक्टिव्ह केली जातील. हे 31 डिसेंबर 2023 पासून सुरू होईल. एनपीसीआय या संदर्भात यूपीआय युझर्सना ई-मेलद्वारे अलर्ट पाठवेल.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)