Top News

दीर्घ आजार व एकटेपणाला कंटाळून वृद्धाने चिरला स्वत:चाच गळा

बल्लारपूर:- एका वृद्धाने स्वतःचाच गळा चिरून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना बल्लारपूर तालुक्यातील किल्ला वॉर्डात बुधवार, १७ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. महादेव वारलू गेडाम (७२) असे मृतकाचे नाव आहे. महादेव वारलू यांना दीर्घ आजाराने पछाडले होते. अशातच ते घरात एकटेच राहात असल्याने नैराश्यापोटी त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे.

महादेव गेडाम हे अविवाहित होते. घरात ते एकटेच राहात होते. मागील वर्षांपासून ते दीर्घ आजाराने ग्रस्त होते. आजार आणि एकटेपणा याला ते कंटाळले होते. त्यांची मानसिक स्थितीही खालावली होती. काही दिवसांपासून ते आत्महत्येचा विचार बोलून दाखवित असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. मंगळवारी रात्री झोपी गेल्यानंतर सकाळी त्यांच्या घरातून कोणत्याही हालचाली होत नसल्याने शेजाऱ्यांनी चौकशी केली असता त्यांचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत होता.

त्यांनी स्वतःचाच गळा चिरून आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अधिक तपास बल्लारपूर पोलिस करीत आहेत. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने