राजुरा तालुक्यातील युवक व महिलांचा आम आदमी पक्षामध्ये धडाडीने पक्षप्रवेश.
राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये गुंड वृत्तीच्या व्यक्तींना आप पक्षात जागा नाही- श्री. सुरज ठाकरे
राजुरा:- आज दिनांक- ०३/जानेवारी/२०२४ ला स्त्री शिक्षणाचा पाया उभारणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाल्य अर्पण करून मानवंदना देत आज मंगल दिनी युवकांनी आम आदमी पार्टी चंद्रपूर चे कामगार संघटन जिल्हाध्यक्ष तथा उपजिल्हाध्यक्ष, चंद्रपूर श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये राजुरा चे युवा आघाडी शहर अध्यक्ष श्री. रोशन बंडेवार आणि कट्टर कार्यकर्ते श्री. महेश ठाकरे यांच्या पुढाकाराने राजुरा तालुक्यातील महिला व तरुणांनी राजुरा येथील आम आदमी पक्ष जनसंपर्क कार्यालयामध्ये *पक्षप्रवेश* केला.
यावेळेस महिला व युवकांनी आम आदमी पक्षाने जे काम दिल्ली, पंजाब मध्ये करून दाखविले त्या कामाचे कौतुक करत हा एकमेव असा पक्ष आहे जो आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था तथा रोजगार यासह जनतेच्या अत्यावश्य गरजा पूर्ण करण्याचा दृष्टिकोनातून काम करतो.
यासह या पक्षामध्ये सुशिक्षित प्रतिष्ठित लोकांचा कल जास्त प्रमाणात असून या पक्षामध्ये गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना तथा अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींना राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये जागा नाही असे या वेळेस आप चे श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी सांगितले.
तसेच राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये जे जनहितार्थ काम आम आदमी पक्षाचे कामगार जिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे हे करतात त्या कामाला प्रेरित होऊन आज राजुरा येथील तरुणांनी आम आदमी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयांमध्ये मा श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रवेश केला. यावेळेस तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
यावेळेस पक्षप्रवेश केलेल्या महिला सौ. वंदना बानकर, सौ. पुष्पा झाडे व श्री. सिद्धेश्वर कोल्हाटवार, तरुण श्री. गौरव निब्रड, रितिक पेंदार, अरविंद मडावी, अमन सोयाम, श्रीकृष्ण वडस्कर, बबल हतवंश, मंगेश कुडे, गुरुदास मडावी, सागर कुडमेथे, सागर येटे, अरबाज मनपुरी आदींनी आज पक्षप्रवेश केला.