ग्राम सेवक प्रशिक्षण केंद्र सिंदेवाही च्या वतीने शाश्वत विकासाचे ध्येय या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

Bhairav Diwase
0

नागभिड:- राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत ग्राम विकास व पंचायत राज विभाग, मंत्रालय मुंबई, जिल्हा परिषद चंद्रपुर तथा ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र सिंदेवाही यांचे वतीने शाश्वत विकासाचे १७ ध्येय व ०९ संकल्पना या विषयावर नागभिड तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीतील ५६० प्रशिक्षणार्थ्यांना  प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षणात गरिबीमुक्त गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ आणी हरीत गांव, आरोग्यदायी गांव, पायाभुत सुविधायुक्त गांव, सुशासनयुक्त गांव, बालस्नेही गाव, सामाजीक न्याय आणी सामाजीक दृष्ट्या सुरक्षीत गांव, महिला स्नेही गाव या नऊ संकलनाचा समावेश करून गावाचा विकास आराखडा कसा तयार करावा यासाठी लागणारे निधीचे स्त्रोत याविषयीची संपुर्ण माहिती प्रशिक्षणात देण्यात आली.

यशदा पुणे येथून प्रशिक्षण घेवून आलेल्या ४० प्रविण प्रशिक्षकाणी १७ ध्येय व ९ संकल्पनाची विस्तृत माहिती प्रशिक्षणार्थ्याना दिली. सदर प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थी म्हणून सर्व ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, रोजगार सेवक, जल सुरक्षक, संगणक परिचालक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसंघ अध्यक्ष सचिव, मुख्याध्यापक हे मोठ्या संख्येत उपस्थित होते.

सदर प्रशिक्षण प्रक्रिया हि नागभिड तालुक्यात पूर्ण झाली असुन चंद्रपुर जिल्हातील आठ तालुक्यातील (4135) चार हजार एकशे पस्तीस लोकांना प्रशिक्षीत केल्या जाणार आहे.

सदर प्रशिक्षण हे चंद्रपुर जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्राम सेवक प्रशिक्षण केंद्र सिदेवाही चे अध्यक्ष  मान, विवेक जॉनसन, (भा. प्र. से.)उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिना साळुंखे, ग्राम सेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्री. गिरीश सुभाष घायगुडे (पाटील), गट विकास अधिकारी नागभिड चे मान.प्रणाली खोचरे, प्रशिक्षण समन्वयक बि. एम. गुंतीवार यांच्या मार्गदर्शनात संपन्न होत आहे.

सावली व सिदेवाही नागभिड तालुक्यात प्रशिक्षण पूर्ण झाले असुन उर्वरीत ब्रम्हपुरी,पोंभुर्णा, बल्लारपुर, राजुरा, चंद्रपुर या तालुक्यात होणाऱ्या प्रशिक्षणात उपस्थित राहूण, प्रशिक्षीत होऊन आपल्या गावाचा शाश्वत विकास साधावा असे आव्हान ग्राम सेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्री घाईगुडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)