Top News

पायी जाताना ट्रकने उडवले; वृद्ध ठार #chandrapur #ballarpur #accident

बल्लारपूर:- शहरातील वेंकटेश कॉम्प्लेक्सजवळील सुभाष टॉकीजसमोरून पायी जाताना ट्रकने धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि.१६ जानेवारीला सकाळी १०:३० च्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर रामदास नगराळे (६९, रा. डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड, बल्लारपूर) असे मृताचे नाव आहे. ज्ञानेश्वर नगराळे हे पायी जात होते.

चंद्रपूरकडून येणाऱ्या एमएच ३४ बीजी १५८९ क्रमांकाच्या ट्रकने धडक दिल्याने नगराळे यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रकचालक अजय गोस्की २५ याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. या परिसरात नेहमीच वाहनांची वर्दळ असते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने