Top News

घरी वाद झाला अन् रागाच्या भरात धावत्या रेल्वेसमोर उडी #chandrapur #mulमुल:- कौटुंबिक कलहातून टोकाचे पाऊल उचलत एका विवाहित महिलेने चंद्रपूर-गोंदिया या धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दि. १६ जानेवारीला दुपारी ३:३० वाजता मूल शहरातील रेल्वे फाटकाजवळ घडली. कृणाली नरेश कामडे (२६, रा. मूल) असे मृत महिलेचे नाव आहे.


मूल शहरातील सिद्धिविनायक मंदिरासमोर नरेश कामडे हे चहाचे दुकान व लहानसे जनरल स्टोअर्स चालवतात. सकाळी पती नरेश आणि पत्नी कृणाली यांच्यात वाद झाला, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून पुढे आली.वादावरून रागाच्या भरात कृणालीने आत्महत्या करण्यासाठी मूल शहरातील रेल्वे फाटकाजवळ दुपारी ३:३० वाजेपर्यंत रेल्वेची वाट बघत होती. दरम्यान, चंद्रपूरवरून गोंदियाकडे जाणारी रेल्वे येताच तिने उडी घेतली. यात तिचा डावा पाय अर्धा तुटला, तर शरीराला गंभीर दुखापत झाल्याने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मात्र, वाटेतच तिचा मृत्यू झाला. तिला ८ वर्षांचा मुलगा व एक वर्षाची मुलगी आहे. कृणालीच्या दुर्दैवी मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पुढील तपास मूल पोलिस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने