वन व्यवस्थापन समिती अध्यक्षानेच केली मोराची शिकार #chandrapur #warora #Peacockhunting

Bhairav Diwase
0


तिघे अटकेत; विल्हेवाट लावताना अडकले जाळ्यात

संग्रहित छायाचित्र


वरोरा:- वनपरिक्षेत्र वरोरा अंतर्गत वाघोली शिवारात विषारी औषधीतून मोराची शिकार केल्याप्रकरणी वरोरा वन विभागाच्या पथकाने मंगळवारी दि. १६ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता वाघोली येथून तिघांना अटक केली.


आरोपींकडून मोराचे मांस व शिकारीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले. विलास नन्नावरे (४२), संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास जीवतोडे (२४), दिगंबर गजबे (३२, सर्व रा. वाघोली) अशी आरोपींची नावे आहेत.


गुप्त माहितीवरून टाकला छापा


वाघोली शिवारात मोराची शिकार करून मांसाची विल्हेवाट लावत असल्याची गुप्त माहिती वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाला मिळाली. दरम्यान, वन विभागाने वाघोली येथे छापा मारून विलास नन्नावरे, संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास जीवतोडे व दिगंबर गजबे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोराचे मांस, पंख, विषारी औषधी टाकलेले धान्य आणि लोखंडी सुरा जप्त केला. ही कारवाई विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, सहायक वनसंरक्षक घनश्याम नायगमकर यांच्या मार्गदर्शनात वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे, क्षेत्र सहायक जितेंद्र लोणकर, क्षेत्र सहायक दिवाकर चांभारे, चंदेल, लडके, बोडे, तिखट, निवारे आदींच्या पथकाने केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)