Top News

शॉर्टसर्किटमुळे घराला आग; साहित्य जळून खाक #chandrapur #pombhurna

पोंभुर्णा:- शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्याची घटना सोमवारी दि. १५ जानेवारीला रात्री ९ वाजताच्या सुमारास जामतुकूम येथे घडली. या घटनेत पांडुरंग केशव पिपरे यांच्या घरातील सुमारे एक लाखाचे साहित्य जळून खाक झाले.

जामतुकूम येथे सोमवारी विजेचा लपंडाव सुरू होता. पांडुरंग पिपरे यांची पत्नी व मुलगा मिरची तोडाईसाठी बाहेर गावी गेले. मोठा मुलगा व त्याची पत्नी वैद्यकीय उपचारासाठी चंद्रपूरला गेले होते. अचानक शॉर्टसर्किट होऊन घराला आग लागली. सरपंच भालचंद्र बोधलकर यांनी तहसीलदार, पोलिस ठाणे व महावितरणाला दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने