Top News

मधमाशांच्या हल्ल्यात ६ महिला मजूर गंभीर जखमी #chandrapur #Beeattack



भंडारा:- रब्बीतील पिकांची काढणी करण्यासाठी गेलेल्या महिला मजुरांवर मधमाशांनी हल्ला चढवला आहे. या घटनेत ६ महिला मजूर गंभीररित्या जखमी झाल्यात. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तालुक्यातील डांभेविरली शेत शिवारात घडली आहे. सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडालीये.


सरीता रामाजी राऊत (५५), कान्होपाञा राकेश राऊत (२६), वनिता हिरालाल शहारे (४०), किरण हिरालाल शहारे (१८), देविका सोमा शहारे (५०) व लता होमराज बुराडे (४०)सर्व राहणार डांभेविरली असे मधमाशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी महिला मजुरांची नावे आहेत.


रामाजी राऊत यांनी दिपक आनंदिकर यांच्या ३ एकर शेतजमीन ठेक्याने केली आहे. खरीप हंगाम संपताच या शेतात मुग पिकाची लागवड करण्यात आली. सध्या मुग पीक कापणीला आलं असल्याने सरिता यांनी गावातीलच काही महिला मजुरांना मुगाची काढणी करण्यासाठी ठेक्याने केलेल्या शेतात घेऊन गेल्या होत्या.


मात्र शेतात पिकांची काढणी करत असताना अचानक मधमाशांनी महिला मजुरांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात 6 महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने