नायलॉन मांजा ठरतोय जीवघेणा #NylonManja #Chandrapur #Nagpur

Bhairav Diwase
0


दोन दुचाकीस्वारांचा कापला गेला गळा, तब्बल 40 जण जखमी

नागपूर:- मकरसंक्रांतीनिमित्त शहरात जोरदार पतंगबाजी झाली. बंदीनंतरही मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर होताना दिसून आला. यामुळे दोन दुचाकीस्वारांचा गळा कापला गेला. यातील एक गंभीर असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 40 पेक्षा जास्त जण किरकोळ जखमी झाले.


दरवर्षी मकरसंक्रांतीला मोठ्या प्रमाणात पतंगबाजी करून सण साजरा केला जातो. घरांचे छतच नाहीतर रस्त्यावरही पतंगबाज धुमाकूळ घालताना दिसतात. एकमेकांची पतंग कापण्यासाठी हे पतंगबाज नायलॉन मांजाचा वापर करतात. त्यामुळे अनेकजण जखमी होतात. अनेकांच्या तर जीवावर बेतते. यामुळे प्रशासनाने नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घातली. त्यानंतरही शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची विक्री व वापर होताना दिसत आहे.


दोन दुचाकीस्वारांचा कापला गळा


नायलॉन मांजामुळे दोन दुचाकीस्वारांचा गळा कापल्याची घटना पुढे आली आहे. पहिली घटना कपिलनगर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. एक दचाकीस्वार जरीपटका रिंगरोडने जात होता. दरम्यान, अचानक नायलॉन मांजा समोर आला. काही समजण्यापूर्वीच त्याचा गळा कापला गेला. आसपासचे लोक मदतीला धावले.


मेयोमध्ये 12 जखमींवर उपचार इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे सोमवारी पतंगाच्या मांजामुळे जखमी 12 जणांवर उपचार करण्यात आले. ते सर्व रुग्ण किरकोळ जखमी होते. त्यामुळे उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)