चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळला #chandrapur #nagbeed


नागभीड:- शहरात मंगळवारी दि. १६ जानेवारीला कोविडचा एक रुग्ण आढळून आला. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी या रुग्णाची आरटीपीसीआर तपासणी करून नमुने चंद्रपूर येथे पाठविण्यात आले होते. मंगळवारी अहवाल प्राप्त झाला. अहवालानुसार हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. रुग्णाला विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला. ज्या नागरिकांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहेत त्यांनी ग्रामीण रुग्णालय किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोविडची तपासणी करून घ्यावी, मास्क वापरावा तसेच गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने