Top News

शेतात न आल्यामुळे वडील रागावले, मुलाने घेतला गळफास #chandrapur #Brahmapuri

ब्रम्हपुरी:- शेतामध्ये का आला नाही म्हणून वडिलाने मुलाला रागावल्यामुळे मुलाने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील रनमोचन येथे गुरुवारी (दि. १८ रोजी) घडली. प्रजण्य रामचंद्र मांदाडे (१७) रा. रनमोचन ता. ब्रह्मपुरी असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.

प्रजण्यला वडिलांनी शेतात काम करण्यासाठी बोलावले होते. मात्र तो दिवसभर शेतात गेला नाही. सायंकाळी प्रजण्यचे वडील घरी जात असताना प्रजण्य शेतात आला. त्यामुळे वडिलाने दिवसभर शेतात का आला नाही, आता कशाला आला असे म्हणून रागावले व ते घराकडे निघाले. मात्र बराच वेळ होऊन मुलगा घरी आला नसल्यामुळे त्यांनी शेताकडे धाव घेतली. यावेळी शेतातील नाल्याजवळील उंबराच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार यांना मिळताच त्यांनी आपल्या चमूंसह घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने