Click Here...👇👇👇

चंद्रपूर जिल्ह्यात एकाची अज्ञाताकडून हत्या #chandrapur #murder #ballarpur

Bhairav Diwase

बल्लारपुर पोलीस व गुन्हे शाखा चंद्रपुर यांची सयुक्त तपासनी सुरु

बल्लारपूर:- बल्लारपूर शहर लगत असलेल्या विसापूर गावात
एका 38 वर्षीय व्यक्तीची अज्ञाताकडून हत्या झाल्याची घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली


यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहिती नुसार विसापूर गावातील वॉर्ड नं 1 मधील असलेले सचिन वांगणे वय 38 वर्ष यांची अज्ञात व्यक्ती नी मध्यरात्री च्या सुमारास हत्या झाल्याची घटना घडली.

मृतक हा ट्रक चालक म्हूणन कार्य करीत होता तसेच त्याचे कुणाशीही वैर नसल्याची माहिती मिळत आहे मग अशा परिस्थितीत त्याची हत्या कुणी व का केली हा तपासाचा विषय आहे.

घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक तपासानंतर मृतदेह उत्तरीय तपासणी नंतर शवविच्छेदना साठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या हत्याचा तपास पोलिस अधीक्षक यांचा मार्गदर्शनात बल्लारपूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर करीत आहे.