अल्पवयीन मुलाने केली जन्मदात्या वडिलांची हत्या #chandrapur #murder #nagbheed

Bhairav Diwase

नागभीड:- क्षुल्लक वादातून एका 17 वर्षीय मुलाने जन्मदात्याची हत्या केली. ही घटना तालुक्यातील वासाळा (मेंढा) येथे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडली. दामोधर केशव गावतुरे (50)असे मृतकाचे, तर प्रफुल्ल गावतुरे आरोपीचे नाव आहे.

मृतकाला दारूचे व्यसन होते. तो नेहमीच मद्यधुंद अवस्थेत राहायचा. घटनेच्या दिवशी मृतकाची पत्नी व आरोपीची आई काही कामानिमित्त बाहेरगावी गेली होती. दरम्यान, वडिल व मुलामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. वडिलाच्या डोक्यावर काठीने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती आरोपीने सरपंचाला दिली. पोलीस पाटलाच्या मदतीने नागभीड पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मुलाविरूद्ध गुन्हा दाखल करून मृतदेह उत्तरीय तपाणीसाठी पाठवण्यात आला. पुढील तपास नागभीड पोलिस करीत आहेत.