Click Here...👇👇👇

नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारूवरून वाद #murder #chandrapur #wardha

Bhairav Diwase

मोठ्या भावाने लहान भावाला काठीने बदडून संपवलं
वर्धा:- वर्धा जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टी सुरू असताना दारू वरुन क्षुल्लक कारणातून वाद झाल्याने, मोठ्या भावाने लहान भावाची काठीने बदडून हत्या केली.

ही घटना आर्वी तालुक्यातील दहेगाव (गोंडी) येथे रविवारी दि ३१ डिसेंबर संध्याकाळी ६ ते ७ च्या सुमारास घडली.

विजय पांडुरंग मसराम (वय ३५) असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. तर गजानन पांडुरंग मसराम असे आरोपी भावाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय पांडुरंग मसराम आणि मोठा भाऊ गजानन पांडुरंग मसराम हे दोघे सोबत दारू प्यायचे. यवरून त्यांच्यात वाद देखील व्हायचे.

३१ तारखेला, संध्याकाळी दारूवरुन दोघांमध्ये क्षुल्लक कारणातून वाद झाला. यामुळे संतापलेला मोठा भाऊ गजानन याने काठीने विजय यास जोरदार महरणार करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत विजय हा गंभीर जखमी झाला. दरम्यान, त्याला उपचारासाठी सेवाग्राम येथील दवाखान्यात भरती करण्यासाठी नेले जात असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

या प्रकाराची माहिती मिळाल्यावर खरांगणा (मोरांगणा) पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सदाशिव ढाकणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सतीश वैरागडे, विठ्ठल केंद्रे यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.