Top News

स्वप्निल काशिकर शिवा वझरकरचा हत्येचा सुत्रधार! #Chandrapur #murder

चंद्रपूर:- दि. २५ जानेवारी रोजी शिवा वझरकर यांची धारदार चाकुने हत्या करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला झालेल्या या हत्येमध्ये शिवसेना (उबाठा) चे वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष स्वप्निल काशिकर, हिमांशू कुमरे, चैतन्य आसकर, रिवान पठाण, नाजीर खान, रोहीत पितरकर, सुमित दाते, अन्सार खान यांचेवर भादंवी ३०२, १४९, १४३, १४७ व मपोअ अंतर्गत १३५ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२५ वर्षीय शिवाच्या हत्येमुळे शहरात खळबळ माजली असुन अपराधी प्रवृत्तीच्या गुन्हेगारांचा राजकीय पक्षातील शिरकावामुळे शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात चंद्रपूर पोलिस अपयशी ठरत आहे, हे या घटनेवरून सिद्ध होत असल्याचे बोलल्या जात आहे. महत्वाचे म्हणजे यापुर्वी ही डिसेंबर २०२३ मध्ये गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा रेती घाटावर तंमुस चे अध्यक्ष व सरपंच यांचेवर प्राणघातक हल्ला प्रकरणी स्वप्निल काशिकर यांचेवर भादंवी ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याला नुकतीच अंतरिम जमानत मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपराधी प्रवृत्तीच्या स्वप्निल काशिकर याचेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून राजकीय दबावाचा वापर करीत जिल्ह्यात गुंडगिरी प्रस्थापित करणाऱ्या स्वप्निल काशिकर याला तडीपार करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सविस्तर वृत्त असे की, मृत शिवा मिलींद वझरकर अरविंद नगर, चंद्रपूर हा ठेकेदारी करीत होता. शिवा वझरकर व त्याचा मित्र हिमांशु कुमरे हे दोन वर्षाआधी स्वप्निल काशिर यांचेकडे ठेकेदारीचे काम पाहत होते. नंतर पैशाच्या कारणावरून स्वप्निल काशीकर यांचेकडे काम करणे सोडले. दोन वर्षापुर्वी स्वप्निल काशिकर याने बुटेल इलेक्ट्रा ही मोसा गाडी शिवा वझरकर यांचे नावानी लोनवर विकत घेतली ती मोसा स्वप्निल काशिकर यांच्या ताब्यात असुन त्याची ईएमआय स्वप्निल भरत नसल्याकारणाने त्यांच्यात नेहमी वाद होत होता.

आता हिंमाशु कुमरे व स्वप्निल काशिकर हे दोघे मिळून ठेकेदारीचे काम करतात. शिवाने स्वप्निल काशिकर कडे काम करणे सोडल्यामुळे यांचे पटत नव्हते व दोघांमध्ये नेहमी वाद होत असायचे. प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला रात्रो ८ वाजता लॉ कॉलेज परिसरात शिवा वझरकर व त्यांचे अन्य मित्र उभे असतांना हिमांशु कुमरे याचा शिवा ला फोन आला व त्याने शिवाला शिवीगाळ करणे सुरू केले. या वादात हिंमाशु कुमरे याने शिवाला स्वप्निल काशिकर याचे कार्यालयापाशी बोलावले. त्यावेळी वरील सर्व आरोपी त्याठिकाणी उपस्थित होते.

सर्व आरोपींनी शिवा व त्याच्या मित्राला घेरून स्वप्निल काशिकर ने हिमांशु कुमरेला आपल्या कार्यालयात घेवून गेला तेथून हिमांशु ने एक लोखंडी चाकु घेवून आला व हिमांशु ने लोखंडी चाकुने शिवा वर वार केले. त्यात शिवा खाली पडला. त्यानंतर उपस्थित सर्व आरोपींनी शिवाला लाथा-बुक्यांनी मारहाण केली. शिवा च्या मित्रांनी नंतर शिवाला एका खाजगी दवाखान्यात नेले असता त्याला त्याठिकाणी मृत घोषित करण्यात आले.

रामनगर पोलिसांनी स्वप्निल काशिकर, हिमांशू कुमरे, चैतन्य आसकर, रिवान पठाण, नाजीर खान, रोहीत पितरकर, सुमित दाते, अन्सार खान यांचेवर भादंवी ३०२, १४९, १४३, १४७ व मपोअ अंतर्गत १३५ गुन्हा दाखल केला असुन या घटनेने चंद्रपूर शहरात स्वप्निल काशिकर या गुंडाची गुंडगिरी कुठपर्यंत चालणार अशी चर्चा सुरू झाली आहे. अपराधी प्रवृत्तीच्या गुन्हेगारांचा राजकीय क्षेत्रात झालेल्या शिरकाव मुळे अपराध्यांना हिंमत वाढत असून त्यामुळे राजकीय पक्षांची ताकद न वाढता फक्त गुन्हेगारी वाढत असते, यांचे भान राजकीय पक्षांनी व नेत्यांनी ठेवायला हवे. अशी अनेक उदाहरणे देशात समोर आली आहेत. स्वप्निल काशीकर हे चंद्रपूरातील एक उदाहरण आहे. चंद्रपूर पोलिसांनी अशा प्रवृत्तीच्या आत्तातरी मुसक्या आवळायला हव्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने