Top News

खासदार क्रीडा महोत्सवात चमकली चंद्रपूरची श्रेया #chandrapur #nagpur


चंद्रपूर:- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाला (Khasdar Krida Mahotsav) शुक्रवार 12 जानेवारी पासून सुरुवात झाली. एथलेटिक्स (विदर्भस्तरीय) स्पर्धा दि. १३ जानेवारी ते १६ जानेवारी पर्यंत घेण्यात आली. यात चंद्रपूर जिल्ह्यातील श्रेया नितीन ईथापे हिने ४ स्पर्धेत ४ मेडल्स प्राप्त केले. यात ३ गोल्ड, १ सिल्व्हर मेडल्सचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील श्रेया नितीन ईथापे हिने एथलेटिक्स (विदर्भस्तरीय) या स्पर्धा ४ स्पर्धेत ४ मेडल्स प्राप्त केले. 100m hurdles गोल्ड, 400m hurdles गोल्ड, 4x400m relay गोल्ड, 4x100m relay सिल्व्हर मेडल्स मिळविले. याचे श्रेय तिने आपल्या आई-वडील, गुरूजींना आणि प्रशिक्षक यांना दिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने