Click Here...👇👇👇

राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा समारोप #chandrapur

Bhairav Diwase

बल्लारपूर:- तालुका क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत केरळच्या संघाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकाविले, तर महाराष्ट्राला दुसरे आणि तर हरयाणाच्या संघाला तिसरे स्थान मिळाले आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर तालुका क्रीडा संकूल येथे ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
केरळच्या संघाला ११ सुवर्ण, ५ रौप्य व ६ कास्य अशी एकूण २२ पदके मिळाली तसेच ६० वैयक्तिक व ३६ रिले मिळून ९६ गुण मिळाले. महाराष्ट्राच्या संघाने ९ सुवर्ण, ३ रौप्य व ७ कास्य अशी एकूण १९ पदके जिंकून ५३ वैयक्तिक व ३६ रिले असे एकूण ८९ गुण मिळवले. तर हरियाणाच्या संघाने ६ सुवर्ण, ९ रौप्य व १ कास्य पदकासह एकूण १६ पदकांची कमाई केली. हरयाणाच्या संघाला ५५ वैयक्तिक व ६ रिले असे ६१ गुण प्राप्त झाले.
राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून प्रथमच तालुका स्तरावर राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत एकूण ३४ संघांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी ११ संघांनी ४० सुवर्ण पदकांची कमाई केली तर १९ संघांनी पदकतालिकेत स्थान मिळवले. केरळ, महाराष्ट्र व हरयाणा यांच्यानंतर उत्तरप्रदेश ३ सुवर्ण, ५ रौप्य व ४ कास्य पदकासह एकूण ३५ गुण, तामिळनाडू २ सुवर्ण, २ रौप्य व ६ कास्य पदकासह एकूण २४ गुण, राजस्थान २ सुवर्ण, २ रौप्य व ४ कास्य पदकासह एकूण २० गुण, छत्तीसगड २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह एकूण २३ गुण, भारतीय शालेय परिषद २ सुवर्ण व १ कास्य पदकासह एकूण ११ गुण, मध्य प्रदेश १ सुवर्ण व २ रौप्य पदकासह एकूण ११ गुण, झारखंड १ सुवर्ण व १ कास्य पदकासह एकूण ६ गुण, लक्षद्विप १ सुवर्ण पदकासह एकूण ५ गुण, कर्नाटक ६ रौप्य व ५ कास्य पदकासह एकूण २७ गुण, आंध्र प्रदेश २ रौप्य व १ कास्य पदकासह एकूण ४ गुण, तसेच केंद्रीय विद्यालय, उत्तराखंड, पश्चिम बंगाल व पंजाब यांनी प्रत्येकी १ रौप्य पदकासह ३ गुण आणि दिल्ली व चंदीगड यांनी प्रत्येकी १ कास्य पदकासह १-१ गुण मिळवत पदक तालिकेत स्थान मिळवले आहे.
याशिवाय चंदिगड, बिहार, सी.बी.एस.सी. वेलफेअर स्पोर्ट्स, दादरा व नगर हवेली, दव कॉलेज मॅनेजिंग, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, इंटरनॅशनल बोर्ड, आय.पी.एस.सी., जम्मू काश्मिर, नवोदय विद्यालय, ओडिशा, पद्दूचेरी, तेलंगणा व विद्या भारतीच्या संघांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदविला.