Top News

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा #chandrapur #Korpana


चंद्रपूर जिल्ह्यातून 'ही' शाळा ठरली प्रथम मानकरी
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना 
कोरपना:- महाराष्ट्र शासनाने शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोग्य स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्यात येत असून यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून अतिदुर्गम कोरपना तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा भोयगाव ही शाळा प्रथम क्रमांकाची मान खरी ठरली आहे

विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील घटकांचा सहभाग या बाबींवर शाळेचे मूल्यांकन करण्यात आले त्यामध्ये जि प चंद्रपूर चे उपशिक्षण अधिकारी विशाल देशमुख,श्री धनपाल फटिंग विस्तार अधिकारी, आणि डायटचे धनराज येनमुलवार, अमोल बल्लावार यांचा समावेश होता

प्रथम क्रमांक आल्याने नागपूर विभागात जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नागपूर विभागीय समितीने सुद्धा शाळेचे मूल्यांकन केले या समितीत श्री उल्हास नरड विभागीय उपसंचालक नागपूर विभाग, श्री दिपेंद्र लोखंडे सहाय्यक संचालक नागपूर मनीषा भडंग वरिष्ठ अधिव्याख्याता डाएट नागपूर, यांचा समावेश होता समितीने भौतिक सुविधा, गुणवत्ता विकास लोकसहभाग व इतर गुणवत्ता पूर्ण उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
या शाळेच्या प्रगतीसाठी शाळेचे मुख्याध्यापक धनराज सोनवणे विषय शिक्षक विजय जांभुळकर निलेश कुमरे गुणवंत खोरगडे, कु.मंजुषा पवार, यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष पिंपळशेंडे,अरविंद लांजेकर सारिखा मंगेश मासिरकर उपाध्यक्ष,मनोहर वांढरे सदस्य संजय जुनघरे,यांनी परिश्रम घेतले.

यासाठी सरोज अंबागडे,अनिकेत दुर्गे शिक्षण समन्वयक अंबुजा सिमेंट फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले असून कोरपना प.स चे शिक्षण अधिकारी सचिन कुमार मालवी,व गटशिक्षण अधिकारी संजय पेंदाम यांनी शाळा समिती,शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत .

जिल्ह्यातून व तालुक्यातून प्रथम येण्यामागची यशोगाथा

स्काऊट गाईड उपक्रम -हा उपक्रम आत्मविश्वास आणि आत्मसन्मान निर्माण करण्यास मदत करतो ते महत्त्वाचे जीवन कौशल्य संघ बांधणी मैदानी साहस शिक्षण आणि आनंद देतात वर्गाच्या पलीकडे जग शोधण्यास मदत करतो आणि सर्वांगीण विकासास मदत करते यावर्षी पद्मापूर या गावी आयोजित शिबिरात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला

शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

स्पर्धा परीक्षा हे एक आव्हान आहे आणि ते पेलायचे असेल तर योग्य मार्गदर्शन अचूक तयारी व त्याला कष्टाची जोड याशिवाय पर्याय नाही म्हणून शाळेत सत्राच्या सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग चालू असतात त्याचे परिणाम म्हणजे या सत्रात वर्ग ५ वी च्या एका विद्यार्थिनीचा नवोदय करता निवड झाली तर शिष्यवृत्ती परीक्षेत वर्ग ५ चे ४ विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत आले आहे

विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन

शाळेत अधिकाधिक देशी खेळांना प्राधान्य देऊन महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेत शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वयोगट १४ वर्षे अंतर्गत जिल्हास्तरावर कबड्डी व खो-खो या स्पर्धेत तालुक्याचे नेतृत्व केले त्याचा फायदा असा झाला की नागपूर विभागीय खो-खो क्रीडा स्पर्धेकरिता एका विद्यार्थिनीची निवड चाचणी करिता निवड करण्यात आली

आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास

बहुतेक सुविधा तसेच अध्ययन व अध्यायनाशी संबंधित आधुनिक साधनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी एनजीओ एसीएफ व अल्ट्राटेक चे लागलेले सहकार्य शाळेची उत्तरोत्तर झालेली प्रगती व शैक्षणिक दर्जा पाहून दानशूर व्यक्तीकडून वस्तू स्वरूपात व २१२८०० रुपयाची देणगी रोग स्वरूपात जमा केली

विद्यार्थी केंद्रित उपक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य

विद्यार्थी केंद्रित उपक्रमात शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेची रंगरंगोटी करणे कुठलाही मेहनताना न घेता शाळेची काम करणे शाळेविषयी पालकांचा व गावकऱ्यांचा ऋणानुबंध निर्माण व्हावा याकरिता पालकांचे मेळावे घेणे गावातील युवा मंडळाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या आयोजन करून बक्षीस देणे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने