Top News

ना. मुनगंटीवार म्हणतात, 'मला लोकसभा लढण्याची इच्छा नाही, पक्षाने आदेश दिल्यास बघू' #chandrapur #Sudhirmungantiwar


चंद्रपूर:- चंद्रपूर लोकसभा (chandrapur loksabha) भाजपाला (Bjp) जिंकता आली नाही. त्यामुळे भाजपाने या लोकसभेवर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. भाजपने सुरू केलेले लोकसभा निवडणुकीसाठी घर चलो अभियानाची सुरुवात झाली. त्यामुळे चंद्रपूर लोकसभेचा भाजपचा उमेदवार कोण? (Who is the BJP candidate for Chandrapur Lok Sabha?) याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. अशातच आज पोंभुर्णा pombhurna) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण (Chhatrapati Shivaji Maharaj) कार्यक्रमात पत्रकारांनी आज लोकसभा लढवण्याची तुमची तयारी आहे काय? असा प्रश्न मुनगंटीवार यांना केला. यावर 'मला लोकसभा लढण्याची इच्छा नाही, पक्षाने आदेश दिल्यास बघू', पक्ष जे सांगेल ते करू. माझी इच्छा तर महाराष्ट्रात राहण्याची आहे. महाराष्ट्रातील जनतेची सेवा करायची आहे. शेवटी पक्ष जो आदेश देईल त्याला नाही म्हणणं हे काही कार्यकर्त्यांच लक्षण नसतं, मी कार्यकर्ता आहे. माझी इच्छा नाही, परंतु पक्ष जर मला आदेश देईल तर बघू.  असं त्यांनी म्हटलं.


चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ (Chandrapur Lok Sabha Constituency) हा काँग्रेसचा (Congress) कधीकाळी बालेकिल्ला होता, पण भाजपच्या (BJP) हंसराज अहिर (Hansraj ahir) यांनी त्यांच्या या गडाला सुरुंग लावला. तब्बल चार वेळा (Fourth time) या मतदारसंघातून ते निवडून आले, पण 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभव सहन करावा लागला होता. काँग्रेसचे बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी त्यांच्यावर विजय मिळविला. हा पराभव अहिर यांच्यासह भाजप पक्षश्रेष्ठींच्या चांगलाच जिव्हारी लागला.

बघा काय म्हणाले ना मुनगंटीवार 


राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेला चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघ (Chandrapur-Vani-Arni Lok Sabha Constituency) काँग्रेस कायम राखणार की भाजप पराभवाचे उट्टे काढणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 


महायुतीकडून भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर (Hansraj ahir) यांच्या तर महाविकास आघाडीकडून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी व वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांचे नाव आघाडीवर असले तरी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwa), आमदार सुभाष धोटे (Subhash Dhote) यांचीही नावे चर्चेत आहेत.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने