Top News

पक्षाने सांगितल्यास कुठेही लढायला तयार #chandrapur #gadchiroli #loksabha #Vijaywadettiwar


आ. विजय वडेट्टीवार चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत



चंद्रपूर:- लोकसभेची निवडणूक (loksabha election) जवळ येत असल्याने राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. आता चंद्रपूरच्या (chandrapur) राजकारणातही नवा ट्विस्ट आला आहे. कालपर्यंत लोकसभा निवडणूक लढविण्यावर चुप्पी साधलेले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी पक्षाने संधी दिल्यास आपली तयारी आहे . पक्षाने सांगितल्यास कुठेही लढायला तयार असल्याचे सांगत अनेकांना धक्का दिला आहे.



चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा (Congress) कधीकाळी बालेकिल्ला होता, पण भाजपच्या (BJP) हंसराज अहिर (Hansraj ahir) यांनी त्यांच्या या गडाला सुरुंग लावला. तब्बल चार वेळा (Fourth time) या मतदारसंघातून ते निवडून आले, पण 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभव (defeat) सहन करावा लागला होता. काँग्रेसचे बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी त्यांच्यावर विजय (vijay) मिळविला. हा पराभव अहिर यांच्यासह भाजप पक्षश्रेष्ठींच्या चांगलाच जिव्हारी लागला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षाने संधी दिल्यास आपली तयारी असल्याचे सांगत अनेकांना धक्का दिला आहे.


राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेला चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघ (Chandrapur-Vani-Arni Lok Sabha Constituency) काँग्रेस कायम राखणार की भाजप पराभवाचे उट्टे काढणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 


महायुतीकडून भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर (Hansraj ahir) यांच्या तर महाविकास आघाडीकडून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी व वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांचे नाव आघाडीवर असले तरी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwa), आमदार सुभाष धोटे (Subhash Dhote) यांचीही नावे चर्चेत आहेत.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने