Top News

ZP शाळा की मधुशाला? चक्क शाळेतच मुख्याध्यापक, शिक्षक दारु पिऊन #chandrapur #Jivati #viralvideoजिवती:- चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व पालकांनी मद्यधुंद मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या सततच्या सवयीला लगाम बसावा यासाठी एक माेठं पाऊल उचलले. त्यांनी मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकाचा शाळेत मद्यधुंद अवस्थेत आल्यानंतर त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.

मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक शाळेत दारू ढोसून बेधुंद अवस्थेत आल्याने विद्यार्थी आणि पालक संतापले. बेधुंद अवस्थेत असलेल्या शिक्षकांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला गेलाय. मुख्याध्यापक व शिक्षक शाळेत सतत दारू पिऊन येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून संतापलेल्या पालक व विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागात तक्रार केलीय.

उत्तम विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेत तीन शिक्षक कार्यरत असून यातील हे दोन शिक्षक शाळेत मद्यपान करून येत असतात. शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क शाळेतच दारूच्या बाटल्या व बिडी बंडल व खर्रा अशा पदार्थांसह बेधुंद शिक्षकांचे अवतार बघायला मिळू लागल्याने पालक व विद्यार्थ्यांनी मिळून त्यांचा चांगलाच समाचार घेतला. या मद्यपी शिक्षकांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन शिक्षण विभागाने संतप्त पालकांना दिले आहे.Post a Comment

थोडे नवीन जरा जुने