Top News

चिमुकल्यांची शालेय बचत बँक देते वित्त व्यवहाराचे धडे! #Chandrapur #pombhurna


जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी साकारली "शालेय बचत बँक"

पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वत:ची शालेय बचत बँक उभारली आहे. या बँकेची गोळा-बेरीज करणारे विद्यार्थीच आहेत. या बँकेची स्थापना 26 जानेवारी 2024 ला करण्यात आली. तर उद्घाटन 14 फेब्रुवारी 2024 ला गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते पार पडले.

1 महिन्यांपूर्वी मुख्याध्यापक अरुण यामावर यांच्या कल्पकतेतून मुलांना बॅंक व्यवहाराचे धडे, प्रत्यक्षात बालपणापासून बचतीची सवय लागावी यासाठी चेक आष्टा जिल्हा परिषद शाळेत शालेय बचत बँक सुरू करण्यात आली आहे. या बँकेचे वैशिष्ट्य म्हणजे कामकाज विद्यार्थीच सांभाळत असून, शाळेतील सर्वंच मुले खातेदार आहेत. एका महिन्यात जवळपास 8,000 रुपये शालेय बचत बँकेत जमा झाले आहेत.

विद्यार्थ्यांना बचत करण्याची सवय लागावी या हेतूने जिल्हा परिषद शाळेत बचत बँक सुरू करण्यात आली आहे. व्यवहारासाठी प्रत्येकाचे स्वतंत्र पानावर व्यवहारन लिहिला जातो. इयत्ता सहावीची विद्यार्थी अनुश्री येलके ही रोखपाल म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडत आहे. खातेदार चिमुकल्यांची पैसे जमा करणे आणि काढण्यासाठी रांग लागते. या पैशातून विद्यार्थी वही, पेन इत्यादी साहित्य खरेदी करतात. त्यामुळे त्यांना बालपणापासून बचतीची सवय झाली आहे. त्याबरोबरच बँकिंगचे व्यवहार बालपणात समजू लागले आहेत. प्रयोगातून विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा, असा शाळेतील शिक्षकांचा उद्देश आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पालक शेती, मोलमजुरी करून उपजीविका भागवतात. ही मुले खाऊसाठी मिळालेले पैसे बँकेत टाकतात. तसेच शालेय साहित्य खरेदीसाठी या पैशांचा वापर करतात. या व्यहारातून त्यांना पैशांची बचत करण्याची सवय लागली आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
अरुण यामावर मुख्याध्यापक
जि. प. उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा


चेक आष्टा जिल्हा परिषद शाळेत शालेय बचत बँक सुरू करण्यात आली आहे. गावातील मुले खाऊसाठी मिळालेले पैसे बँकेत टाकतात. या पैशातून विद्यार्थी वही, पेन इत्यादी साहित्य खरेदी करतात. त्यामुळे त्यांना बालपणापासून बचतीची सवय झाली आहे.
संतोष बोंडे
अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती चेक आष्टा
  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने